Vidarbh24News

Latest Online Breaking News

एक दिवस सूरू होऊन बंद पडला हाईमॅक्स….

एक दिवस सूरू होऊन बंद पडला हाईमॅक्स…..
*तालुक्यातील मालपिरंजी येथील प्रकर *
*लाखो रुपये पाण्यात *
सावली ( लोकमत दुधे )
ग्रामीण भागात नेहमी होत असलेल्या विजेच्या लपंडावामुळे किमान सायंकाळच्या वेळेस गावातील मुख्य चौक प्रकाशमान राहावे म्हणून गाव तिथे मुख्य चौक़ात सौर ऊर्जा प्रकल्या अंतर्गत हाईमॅक्स ची योजना राबविण्यात आली मात्र आजच्या घडीला सौर ऊर्जा वर चालणारे आणि ग्रामीण भागातील मुख्य चौक़ात बसविण्यात आलेले अनेक हाईमॅक्स अनेक ठिकाणीं बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर येत आहे. सावली येथील जवळच असलेल्या ६०० लोक वस्तीच्या मालपिरंजी गावात मागील वर्षात गावाच्या मुख्य चौकात सौर ऊर्जेवर चालणाऱ्या हाईमॅक्स ची निर्मिती करण्यात आली. यासाठी लक्ष रूपये १४ व्या वित्त अंतर्गत खर्च करण्यात आले असे मालपिरंजी वासियाकडून बोलले जात आहे मात्र हाईमॅक्सच्या निर्मितीनंतर केवळ एकच दिवस हाईमॅक्स प्रकाशमान होऊन मागील वर्षापासून अंधेरा कायम रहे या सुभाशीताप्रमाणे धूळखात बंद अवस्थेत पडून असल्याने या कामासाठी लागलेला लक्ष रूपये वाया गेला असे म्हणणे वावगे ठरू नये. शासनाच्या जणकल्याणकारी योजने अंतर्गत निर्माण झालेल्या अनेक योजनांची अशी वाट लागली असेल तर त्याची तक्रार करावी कोणाकडे असा यक्ष प्रश्न गाववासियांकडून केला जात आहे. मात्र अशा गंभिर बाबीकडे कुणाचे लक्ष असू नये याबाबत शंका व्यक्त केली जात आहे आजही ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे या भागांतील अनेक गावं जंगलव्याप्त असल्याने वन्यजीवांची मोठी दहशत निर्माण होत असते विजेच्या लपंडावमुळे किमान सौर दिव्याच्या माध्यमातून गाव प्रकाशमान होइल किंवा गावातील मुख्य चौक प्रकाशमान होतील हा उद्देश्य जरी शासनाचा असला तरी बंद अवस्थेत असलेल्या हाईमॅक्समुळे लाखो रुपये व्यर्थ जात असल्याचे सदर प्रकारातून दिसून येत आहे तेव्हा लाखो रूपये खर्च करून निर्माण केलेले हाईमॅक्स त्वरील दुरूस्त करण्याची मागणी गाव वासियाकडून केली जात आहे …..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!