खाजगिकरण क्षेत्रातही आरक्षणाची गरज- प्रा. डॉ . दिवाकर उराडे
खाजगिकरण क्षेत्रातही आरक्षणाची गरज- प्रा. डॉ . दिवाकर उराडे
* प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य *
* ऑल इंडिया मूलनिवासी बहुजन संघटनेचा उपक्रम *
सावली ( लोकमत दुधे )
बदलत्या परिस्थितीत खाजगिकरनाचा मोठा फंडा निर्माण झाला परिणामी रोजगार आनी नोक ऱ्याचे प्रमाण कमी झाले त्यामुळे बेकारांची संख्या वाढली त्यामुळे अनेक प्रायवेट सेक्टर मधे सुध्दा आरक्षणाची गरज निर्माण होत आहे ,असे परखड मत डॉ दिवाकर उराडे यांनी व्यक्त केले,ते आलइंडिया मुलनिवाशी बहुजन संघटना यूनिट सावली च्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या आयोजित कार्यक्रमात बोलत होते,यावेळी मंचावर ऑड पि.पि.शेंडे,ऑड लाडे भावना बोरकर,योगीता उराडे,आदी मान्यवर उपस्थित होते.
शासकीय, निमशासकीय नौकरीत आरक्षण असल्याने एस.सी,एस टी. ओबीसी जातीतील अनेक तरुण शिक्षण घेऊन उच्च पदावर ,नौकरी करु लागले, त्यामुळे अल्पसंख्याक, मागासवर्गीय लोकांनी आपला दर्जा सुध्दा शिक्षण व नौकरीने उंचावला ,त्यामुळे त्यांची होणारी प्रगती काहीना खपत असल्याने त्यांनी अनेक शासकीय कंपन्याचे खाजगीकरण सुरू केले, त्यामुळे खाजगीकरनात स्व मालकी असल्याने आणि तिथे आरक्षण नसल्याने अनेक कर्मचारी सेवेपासुन कमी तर अनेक तरुनाना नोकरीच्या संधी पासून मुकावे लागत असन्याची वेळ निर्माण होत आहे परिनामी देशात बेरोजगारी वाढ़ताना दिसुन येत त्यामुळे खाजगीकरनाताही आरक्षणाची गरज आहे तेव्हाच समाजासह देशाचा विकास होईल आणि आर्थिक समस्या व बेरोजगारी दुर राहील असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले,
मान्यवरांनी आपले मत व्यक्त करत लोकशाही बळकटीकरणासाठी स्वातंत्र्य,समता ,बंधुता,न्याय ,समाजवाद,धर्मनिरपेक्षता ,अखंडता हेच संविधानाची उद्देशिका असल्याचे सांगितल्या गेले.
कार्यक्रमाची सुरुवात घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मार्लापण करुन करण्यात आली, या निमित्ताने गितगायनाचा स्पर्धा घेण्यात आली,
कार्यक्रमाचे संचालन प्रा.स्मिता राऊत यांनी केले तर आभार रुपचंद लाटेलवार यांनी मानले …..



