सावली तालुका काँग्रेस कमेटि तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा …..

सावली तालुका काँग्रेस कमेटि तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा …..
सावली ( लोकमत दुधे )
हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित प्रचंड मोठी लोकशाहीचा आधार असलेले भारताचे संविधान,संविधान समितीने समोर २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले.
जवाहरलाल नेहरू यांनी ३१ डिसेंबर, इ.स. १९२९ रोजी लाहोरजवळ रावी नदीच्या काठी तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची (स्वातंत्र्याची) घोषणा केली होती.त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते.भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते आणि आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती.
या सुवर्णं पर्वावर मा.श्री.विजय भाऊ वडेट्टीवार जनसंपर्क कार्यालय, सावली येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला.भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण व मेणबत्ती लावून अभिवादन करण्यात आले.व भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करुन सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे यांनी उपस्थितांना भारतीय संविधानाप्रति व देशाप्रती एकनिष्ठ राहण्याचे शपथ दिली.नंतर कार्यालयात राष्ट्रध्वाजाला राष्ट्रीय मानवंदना देत मा.नितीन गोहणे यांच्या हस्ते फडकविण्यात आला.प्रजासत्ताक दिन चिराऊ हो या घोषणेच्या गजरात संपूर्ण परिसर राष्ट्रभक्तिमय झाले होते.
या प्रसंगी काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष विजय मुत्यालवार, न.प.सावलीच्या नगराध्यक्ष सौ.लताताई लाकडे,सावली उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार, सावली शहराध्यक्षा सौ.भारती चौधरी,अंतबोध बोरकर नगरसेवक,प्रीतम गेडाम नगरसेवक,सचिन सांगिडवार नगरसेवक,सौ.साधना वाढई नगरसेविका,सौ.सिमा संतोषवार नगरसेविका,सौ.राधा ताटकोंडवार नगरसेविका, सौ.प्रियांका रामटेके नगरसेविका, सौ.ज्योती शिंदे नगरसेविका, सौ.अंजली देवगडे नगरसेविका, सौ.ज्योती गेडाम नगरसेविका व ,सौ.कविता मुत्यालवार,मोहन कमलेश गेडाम तालुकाध्यकक्ष नितिन गोहने उपस्थित होते ……