Vidarbh24News

Latest Online Breaking News

*टाटा येसची दुचाकीला धडक दोन दोन गंभीर

*ब्रेकिंग न्युज*
*टाटा येसची दुचाकीला धडक दोन दोन गंभीर*
*खेडी फाट्यानाजिक घटना*

*सावली*– टाटा येस या वाहनाच्या धडकेने खेडी फाट्यावर अपघात झाल्याने दोन इसम गंभीर जखमी झाले. शुभम परशुराम गुरनुले वय (25).रा.सावली, राजकुमार बापूजी मोहूर्ले वय 40 वर्षे रा. सावली असे गंभिर जखमीचे नाव असुन ते आपल्या दुचाकी क्र .एम एच ३४ बिसी ८२३० या दुचाकीने मूल वरून आपल्या स्वागावी सावली कडे येत होते त्याच विरुद्ध दिशेने सावली कडून मूलकडे भरधाव जाणाऱ्या टाटा येस क्र. एम एच ४९ डी २०२२ या चार चाकी वाहनाने जोरदार घडक दिल्याने राष्ट्रिय महामार्ग खेडी फाट्याजवळ मोठा अपघात होऊन दोन जण गंभीर जखमी झाले घटनेची माहिती होताच पोलिस कर्मचारी घाऊन आले लागलीच जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने दोन्ही जखमींना चंद्रपूर सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. पुढील तपास सुरु आहे.

राष्ट्रिय महामार्ग सूरू झाल्या पासुन अपघाताची मालिका सुरू असून खेडी फाट्यानजिक आठवडा भरतील ही तिसरी घटना आहे. सदर परिसरात जळवाहणे लंब्या पल्लाची वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी राहत असल्याने व सदरचा मार्ग हा वळणदार असल्याने समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज लागू शकत नाही परिणामी अपघाताला आमंत्रण दिल्या जात आहे. तेव्हा राष्ट्रीय महामार्ग गावालगत रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या जडवाहनावर कार्यवाही करण्यात यावी जेणेकरून अपघाताला नियंत्रण बसेल अशी मागणी जोर धरत आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!