राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात
राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात ……
सावली ( लोकमत दुधे )
दिनांक २५ जानेवारी, २०२३ रोजी सावली तालुक्यामध्ये तहसिल कार्यालय, सावली च्या वतीने १३ वा राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. नवयुवकांचा मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग वाढविण्याचे हेतूने सन २०११ पासुन देशभरात दरवर्षी हा २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येत आहे. मतदार दिनानिमीत्त तहसिल कार्यालय, सावली व रमाबाई आंबेडकर कनिष्ठ कला महाविद्यालय, सावली यांच्या संयुक्त विद्यमाने सावली शहरामधून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. तसेच तहसिल कार्यालय, सावली येथील सर्व कर्मचा-यांना मतदार शपथ देवून मतदार दिन साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रम तालुक्याचे तहसिलदार श्री. परिक्षीत पाटील यांचे मार्गदर्शनामध्ये नायब तहसिलदार श्री. सागर कांबळे तसेच रमाबाई आंबेडकर कनिष्ठ कला महाविद्यालयचे प्राचार्य श्री. शेंडे यांच्या सहकार्याने पार पाडला …..



