माणूस घडवणारी कार्यशाळा म्हणजे रासेयो शिबिर – राजाबाळ पाटील संगिडवार
माणूस घडवणारी कार्यशाळा म्हणजे रासेयो शिबिर – राजाबाळ पाटील संगिड
सावली ( लोकमत दुधे )
राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय व ग्रामपंचायत जिबगाव च्या वतीने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय कार्यक्रम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जिबगाव येथे पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव राजाबाळ पाटील संगीळवार यांनी राष्ट्रीय सेवा योजना शिबिर हे माणूस घडवणारी कार्यशाळा असून रासेयो शिबिराच्या माध्यमातूनन व्यक्तिमत्व समृद्ध होत असून शिबीर म्हणजे आत्मविष्काराची संधी असते असे विचार मांडले यावेळी राकेश गोल्लेपलीवार,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोब्रागडे , डॉ. दिवाकर उराडे आदी मान्यवर उपस्थित होते दिनांक १६ ते २२ जानेवारी या सात दिवशीय शिबिरामध्ये श्रमदान, बौद्धिक सत्र, विविध खेडस्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सर्वे असे विविध उपक्रम पार पडले दिनांक २१ जानेवारी ला समारोपीय कार्यक्रम पार पडला ग्रामपंचायत च्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी यांना सन्मानित करण्यात आले. दिवसीय शिबिराचं अहवाल सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. दिलीप कामडी यांनी सादर केला डॉ. रामचंद्र वासेकर यांनी विविध उपक्रमातील विजेत्या स्पर्धकांची घोषणा केली केले संचालन किशोर बोरकुटे तर आभार समिधा आगडे हिने मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर, डॉ. दिलीप कामडी, प्रा. स्मिता राऊत तसेच जिबगाव ग्रामवासी यांचे सहकार्य लाभले ……



