युवकांनी मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे – खा.अशोकजी नेते
युवकांनी मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे …… खा.अशोकजी ने
* सिद्धिविनायक मंडळ पारडी च्या वतीने कबड्डी सामन्याचे आयोजन *
सावली ( लोकमत दुधे
सिद्धिविनायक युवा बचत गट मंडळ पारडी तालुका सावली जिल्हा चंद्रपूर यांच्या वतीने भव्य डे – नाईट कबड्डी स्पर्धेचे शुभारंभ व उद्घाटन या क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते करण्यात आले
खासदार अशोकजी नेते यांनी या कार्यक्रमाच्या उद्घाटक प्रसंगी बोलतांना युवकांनी कबड्डी अशा या मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे आहे.कबड्डी हा खेळ पारडी या छोटयाशा खेळ्या गावात भव्य रात्रकालीन खुली कबड्डी स्पर्धा आयोजन करणे कौतुकास्पद आहे. अशा मैदानी खेळाचे आयोजन करणे गरजेचे आहे.याचा आदर्श सभोवतालच्या परिसरातील गावांनी घेतला पाहिजे.अशा या मैदानी खेळामुळे युवकांना उत्साह,आनंद मिळतो.खेळामुळे व्यायाम होते. युवकांचे आरोग्य हेल्थ चांगले राहते.त्यामुळे युवकांचा उत्साह (जोश) निर्माण करण्याकरिता मैदानी खेळाचे आयोजन करणे आवश्यक व गरजेचे आहे. असे प्रतिपादन या कार्यक्रमा प्रसंगी खा.अशोकजी नेते यांनी केले.
पुढे बोलतांना देवटोक या ठिकाणी १५ लक्ष रुपयाचा निधी मंडप सभागृहासाठी उपलब्ध करून दिल्या जाईल.तसेच या परिसरामध्ये अनेक दिवसापासून वाघाची दहशत आहे. वाघाने या भागात अनेक इसमाचा बळी घेतलेला आहे. त्यासाठी वाघाच्या संदर्भामध्ये कसा बंदोबस्त केला जाईल याकडे सुद्धा लक्ष दिले जाईल.तसेच पारडी या गावातील विविध समस्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार करण्यात येईल.असे यावेळी युवकांना मार्गदर्शन करतांना खासदार अशोकजी नेते यांनी केलेतसेच या प्रसंगी जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी प्रास्ताविक मार्गदर्शन करतांना कबड्डी या स्पर्धेच्या निमित्ताने पारडी या गावी युवकांना प्रोत्साहन देऊन मैदानी खेळाचे नियम पाळून युवकवर्गानी आनंद,उत्साहाने व आनंदाने मैदानी खेळ खेळावे.असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष ओबिसी मोर्चा चे तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल यांनी केले.यावेळी प.पु.मुरलीधर कार्तिक स्वामी महाराज यांनी खेळ खेळत असतांना गावामध्ये झगळे भांडण न करता शांत पध्दतीने खेळ खेळावे जेणेकरून कुठल्याही पद्धतीचे गावाला गालबोट लागू नये असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी सर्वप्रथम स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून , भारत माता की जय या जय घोषाने सुरुवात केली
खासदार अशोकजी नेते यांनी स्पर्धेत सहभागी झालेल्या युवक खेळाडूंचे हस्तांदोलन करून अभिनंदन केले
या स्पर्धेचे संचालन दीपकजी शेंडे यांनी केले तर आभार राकेश मडावी यांनी मानले.तसेच याप्रसंगी पारडी येथील कबड्डी या स्पर्धेचे उद्घाटन आटोपून अशाच स्पर्धेचे आयोजन कवठी या गावी क्रिकेट व कबड्डी स्पर्धा अशा दोन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होत प्रत्यक्ष मंडळाला व खेळाडू युवकांना भेटून खासदार महोदय साहेब यांनी कौतुक करून अभिनंदन केले व नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी खासदार अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चा तथा तालुकाध्यक्ष अविनाश पाल, नगरसेविका निलम सुरमवार, प.पु.मुरलीधर कार्तिक स्वामी महाराज,माजी सभापती छायाताई शेंडे, सरपंच बंडु मेश्राम, उपसरपंच पारस नागापुरे,जेष्ठ नेते अरुण पाल, नितिन राजुरकर,दिपक शेंडे,राकेश मडावी, माजी सरपंच तथा भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते डोपा पा.बट्टे, देवराव चिताळे,गितेश चिताळे,सुनिता शेंडे ग्रा.प.सारीका भोयर ग्रा.प,निता नरुले ग्रा.प, ज्योती पाल ग्रा.प. सदस्या,आनंद खजांजी सोशल मिडीया प्रमुख, तसेच कार्यकर्ते, खेळातील युवक वर्ग व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते ……