पेंढरी मक्ता येथे संस्कृतीक कार्यक्रम संपन्न ..
पेंढरी मक्ता येथे संस्कृतीक कार्यक्रम संपन्न ……
सावली ( लोकमत दुधे )
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेंढरी मक्ता येथे शालेय विध्यार्थी चे संस्कृतीक कार्यक्रम नुकतेच संपन्न झाले.
विध्यार्थी च्या अंगी असलेल्या सुप्त गुणांचा विकास होऊन सृजनशीलतेला चालना मिळावी, कलेत आवड निर्माण होऊन शिस्त, त्याग, अहिंसा, सत्य, शील, या मुल्याचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा पेंढरी मक्ता यांनी विविध स्पर्धा व संस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कर्यक्रमाचे उदघाटन सावली तालुका काँग्रेस चे अध्यक्ष नितीन गोहणे यांनी केले व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून गावच्या प्रथम नागरिक ठुमांदेवी वलादे या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून वसुधा अल्लूरवार, दैनिक नवराष्ट्र चे पत्रकार लखन मेश्राम, माजी सरपंच वसंत अल्लूरवार, उपसरपंच नभास शेडमाके, वैभव कोरगादेवार, काशिनाथ कोवे, विवेक मुप्पावार, अंजु बोरेवार, कुसुम गावळे, वैशाली भोयर,, संगीता शेडमाके, प्रल्हाद भोयर, प्राचार्य समर्थ सर, सौ लाटेलवार आरोग्य सेविका, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष गावळे,प्रतिभा गंडाते, यावेळी उपस्थित होत्या
भिन्न भिन्न स्पर्धा मध्ये पेंढरी शाळेतील विध्यार्थी नि यश प्राप्त केले होते त्या सर्व विध्यार्थी चे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकार लखन मेश्राम, श्री काटवले यांनी पेंढरी शाळेसाठी भरीव मदत केली त्याचा शाडेच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला
आजचा विद्यार्थी हा देशाचा उत्तम नागरिक आहे. त्याला घडवीण्याचे कार्य शिक्षकांच्या हातून केले जाते. शिक्षण हे माणसाला मानवी जीवन कसे जगावे याचे धळे देते म्हूणन प्रेत्येक नागरिकांनी आपल्या मुलाला शिकविले पाहिजे असे विचार उदघाटक नितीन गोहणे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रम चे प्रसत्विक शाळेचे मुख्यध्यापक नरेश आभारे यांनी केले त्यांनी शाडेच्या प्रगतीचा आलेख सविस्तर सांगितलं. संचालन प्रियदर्शन मडावी यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन किशोर नैताम यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी करिता लता दिवटे, वंदना हनवते शिक्षिका यांनी हात भार लावले कार्यक्रमाला मोढ्या संसखेनी नागरिक उपस्थित होते……



