*ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावली तर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा*
*ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावली तर्फे राष्ट्रीय युवा दिन साजरा*
प्रतिनिधी:
ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावली तर्फे युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद जयंती- महात्मा ज्योतिबा फुले वाचनालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सुरूवातीस स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन आणि पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.खोब्रागडे हे होते.स्वामी विवेकानंद श्रध्दा ठेवणारे होते पण अंधश्रद्धा मानणारे नव्हते.असे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विश्वशांती कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मुप्पावार,ज्येष्ठ शिक्षक,सामाजिक विचारवंत,स्वामी विवेकानंदांच्या चरित्राचे गाडे अभ्यासक प्रा.मिलिंद सुपले,पत्रकार संघाचे अध्यक्ष सूरज बोम्मावार हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूरज गुरनुले यांनी मांडले तर संचालन प्रवीण चौधरी,आणि आभार कु.सलोनी कावळे हिने मानले.कार्यक्रमाला ज्ञानज्योती फाउंडेशन चे पदाधिकारी, युवक,युवती तथा माळी समाज बांधव उपस्थित होते.



