एस.सी,एस,टि,ओबीसी,भारतातले मुळ निवासी- अँड.पि.पि.शेंडे
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतनिमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रम”
*सावली*–(बाबा मेश्राम)
महापुरुषाच्या विचाराशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही , देशाची वाटचाल पाहाता देश हा महापुरुषाचा विचारांचा ,त्यांच्या कार्याचा ऋणी आहे ,त्यामुळे त्यांची शिकवण हिच संपत्ती आहे, तर या देशामध्ये पिढ्यानपिढ्या वास्तव्य करीत असलेले,जल ,जंगल ,जमीन चे रक्षक, शेतीतुन बी टाकून धान्य उत्पादन करणारे , देश सेवा करणारे एस सी,एस टि,ओबीसी हेच या देशात मुलनिवासी आहेत, असे परखड मत अड.पि.पि शेंडे यांनी व्यक्त केले ,ते जिजाऊ जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त ,राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभाग, सांस्कृतिक विभाग व क्षितिजा महिला मंडळ सावलीच्या वतीने सम्यक कालनी परिसरात जिजाऊ जयंती व सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला ,यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक संभाजी दुर्गे, र.आ.वि तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एन एल शेंडे, अड.शेंडे, सौ.उराडे,सौ ,गोंगले, आदी उपस्थित होते…
भारत हा देश नाही तर तो भारतीय उपखंड आहे ,या उपखंडात भारत ,पाकिस्तानी ,नेपाळ ,भुतान ,बांगलादेश, आदीचा समावेश होतो आणि याचे रक्षण व वास्तव्य करणारे मुलनिवासी आहेत, असे त्यांनी मार्गदर्शन करताना स्पष्ट केले,
कार्यक्रमात डॉ. दिवाकर उराडे यांनी साडे तिनशे वर्ष ज्या शिवाजी महारांजानी रयतेचे राज्य उभे केले ,स्वराज्य उभे केले ,त्या महारांजाची प्रेरणा हि त्यांच्या मातोश्री जिजाऊ माता होत्या ,त्यामुळे अठरा पगड जाती चे स्वराज्य उभे राहीले असे त्यांनी विचार त्यांनी मांडले.
.कार्यक्रमाचे संचालन रा.म.गा.म च्या प्राध्यापिका स्मिता राऊत तर आभार घनश्याम मेश्राम यांनी मानले..।
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक खोब्रागडे यांच्या. मार्गदर्शनाखाली, गिरीश डोंगरे,अभि बाबनवाडे, रोहित कोसनकार,साक्षी गणदांते. आदींनी सहकार्य केले.



