*सावली येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव
*सावली येथे वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव संपन्न*
प्रतिनिधी:
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा सावलीच्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ५४ वी पुण्यतिथी महोत्सव श्री गुरुदेव सेवा मंदिराच्या प्रांगनात दिनांक ७ व ८ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सकाळी सावली ग्रामाची ग्राम सफाई करण्यात आली.त्यानंतर ध्यांनपाठ,योगा प्राणायाम यावर प्रा.सुपले सर व सुधाकरजी गाडेवार यांचे मार्गदर्शन लाभले.दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये भजन,कीर्तन,महिला मेळावा,महिला प्रबोधन, सामुदायिक प्रार्थना,असे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी संपूर्ण सावली नगरातून राष्ट्रसंत तुकडोजी महराजांची रामधून काढण्यात आली.यामध्ये अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ खेडी,चीमढा,कवठी,पारडी, रुद्रापुर,मुल,मारोडा,तसेच सावली येथील गुरुदेव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.ह.भ.प.चेतनदादा कवाडकर यांच्या किर्तनाने गोपाळकाला करण्यात आला.

त्यानंतर सर्वधर्म प्रार्थना व राष्ट्रसंतांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.आणि राष्ट्रवंदना घेऊन महोत्सवाचा समारोप करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे सेवधिकारी प्रभाकरजी गाडेवार,उपसेवाधिकारी सुधाकरजी गुंतीवार,कोषाध्यक्ष शामरावजी अनंतलवार, सचिव सुधाकर कोलप्याकवार,सेवाधिकारी सुधाकरजी गाडेवार सचिव रत्नाकरजी, येनगंदेवार तसेच मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांचे तथा सेवकांचे सहकार्य लाभले.



