*सावली येथे आरोग्य तपासणी शिबिर*

*सावली येथे आरोग्य तपासणी शिबिर*
“ज्ञानज्योती फाऊंडेशन व माळी समाजचा उपक्रम+
*सावली(बाबा मेश्राम)–क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव च्या औचित्याने ,ज्ञानज्योती फांऊंडेशन व.माळी समाजाच्या वतीने सावली येथील महात्मा ज्योतिबा फुले ,नगरी येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले ,सदर शिबिरात ६०० लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली,यात बहुजन मेडीकोज असोसिएशनची डॉक्टर टिम सहभागी झाली,
सदर आरोग्य तपासणी शिबिरात हाडांची तपासणी,स्त्रीयांचे आजार,बालकांचे आजार,ह्दयरोग,दंतरोग, किडनी सर्जन ,आयुर्वेद ,मुत्रविकार,मेंदू,अशा विविध आजारांवरील आरोग्य तपासणी करण्यात आली.
सदर आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध बालरोग तज्ञ व.सामाजिक कार्यकर्त्या डॉ अभिलाषा गावतुरे यांनी केले,यावेळी बहुजन मेडिकोज असोसिएशनचे स्त्री रोग तज्ञ डॉ ,अमित गुरुनुले,अस्थी रोग तज्ञ बाळु सहारे,जनरल फिजीशिअन डॉ सौरव.गोबाडे,पॉथालाजिस्ट डा राकेश गावतुरे, डॉ अपेक्षा बांबोळे, डॉ तुषार मर्लावार,डॉ कुशाल.कावळे,डॉ फरहान काझी,डॉ प्रणय भगत आदी उपस्थित होते,
विविध आजारावरील.रुग्णांची तपासणी करुन त्यावर उपाय करण्याचे सांगण्यात आले,तसेच सकस आहाराविषयी,मानसिक ताणतणाव याविषयीची माहीती देण्यात आली.
युवा समाज प्रबोधनकार आकाश टाले (सप्त खंजेरी वादक) नागपूर यांचा जाहीर प्रबोधन कार्यक्रम रात्रौ(1जाने.) ला घेण्यात आला ,यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती,सोबतच २ व ३ जानेवारी ला सुध्दा सावित्रीबाई फुले जयंती महोत्सव निमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत ,त्याचा सुधा नागरीकांनी उपस्थित राहुन लाभ घेण्याचे आवाहन ज्ञानज्योती फाउंडेशन व माळी समाज सावली च्या वतीने करण्यात आले आहे….