Vidarbh24News

Latest Online Breaking News

*अपंग ,गरजुंना  ब्लाँकेट वाटप करुन साजरा केला अभिष्टचिंतन  सोहळा*…

*अपंग ,गरजुंना  ब्लाँकेट वाटप करुन साजरा केला अभिष्टचिंतन  सोहळा*…

*केशवराव लाटेलवार यांचा मुलांनी केला 80 वा वाढदिवस साजरा*

*थाटात पार पडला सोहळा*

सावली (लोकमत दुधे)-

1 जानेवारी  2023 ला आयु केशवराव व्येकुजी लाटेलवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मुलांकडून अभीष्टचिंतन सोहळा साजरा करण्यात आला. कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पाडण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शोभाताई फडणवीस माजी कॅबिनेट मंत्री उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे मुख्य अतिथी राजाबाळ पाटील संगीडवार, सचिव भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावली. प्रा. डॉ इसादास भडके साहित्यिक, प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड साहित्यिक, प्रल्हाद कावळे सर, विश्वशांती विद्यालय सावलीचे माजी सेवा निवृत्त शिक्षक, ए. आर. दुधे सर रमाबाई आंबेडकर विद्यालयाचे माजी प्राचार्य, सावली शहराच्या नगराध्यक्ष लताताई लाकडे, के. एन. बोरकर सर डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष, राजुरा शहरातून आलेले बराच प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. लाटेलवार परिवाराचे बरेचशे नातेवाईक आणि पूर्ण लाटेलवार परिवार उपस्थित होता.

अपंग आणि गरजू व्यक्तींना ब्लॉकेटचे वितरण करण्यात आले. सावली शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर च्या विचारसरनीवर चालणारा एक आदर्श परिवार आहे असा उल्लेख नगराध्यक्ष लताताई लाकडे यांनी केला, प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड सरांनी लाटेलवार परिवारातील तीन मुलांनी आपल्या वडिलाचा 80 वा वाढदिवस साजरा समाजासमोर एक नवीन पायंडा घालून दिला असे म्हणाले. केशवराव लाटेलवार यांनी अत्यंत कठीण परिस्थितीत तीनही मुलांना शिकवून तीनही आज चांगल्या स्टेटस मध्ये याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. आपल्या मुलाचा आणि स्वताचा वाढदिवस साजरे करणारे या जगात अनेक लोक आहेत परंतु आपल्या म्हाताऱ्या वडिलाचा वाढदिवस साजरे फार दुर्मिळ आहेत असा उल्लेख प्रा. डॉ इसादास भडके यांनी केला. या कार्यक्रमाची सुरवात प्रस्ताविकेनी प्रा. डॉ संजय केशवराव लाटेलवार यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ अरुण लाडे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन रुपचंद लाटेलवार यांनी केले ……
यावेळी ,अविनाश पाल, सतीश बोम्मावार,लोकमत दुधे , अशोक आकुलवार, बाबा मेश्राम,सह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते..

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!