Vidarbh24News

Latest Online Breaking News

भौतिक सुविधेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात …..

भौतिक सुविधेच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात …..
*पालकासह विद्यार्थी धडकले पंचायत समितीवर *
* चकपेटगाव वन्यजीवांचे वावर *
* शाळेत सरंक्षक भींत ; मुत्री घर ; शौचालयाचा अभाव *
सावली ( लोकमत दुधे )
तालुक्यातील चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधेच्या मागणीसाठी विद्यार्थी पंचायत समितीला धडकले. भौतिक सुविधेच्या समस्या सोडवा अशी मागणी सावलीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
सध्या तालुक्यात वाघाने धुमाकूळ घातलेला असून तालुका वासिया भयभीत झालेले आहेत. मागील आठवड्यात वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेलेला आहे. दिवसेंदिवस तालुक्यात वाघाची दहशत वाढतच आहे. सावली पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या चकपेटगाव येथे जिल्हा परिषद शाळा असून १ ते ४ पर्यंत वर्ग आहेत. सदर गाव हे जंगलात असून वन्य प्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेला भौतिक सुविधांचा अभाव असून या शाळेत शिक्षण घेणारे विद्यार्थी जंगलात शौचास जात आहेत. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू शकते. याकरिता पालकांनी मागील ऑक्टोंबर महिन्यामध्येच शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी संबंधित पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने शेवटी सदरहू शाळेला मुत्रीघर, संरक्षण भिंत व शौचालयाची मागणी करण्यासाठी चकपेटगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी पंचायत समितीला धडकले व आपल्या मागणीचे निवेदन पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्याकडे दिले ……
……………………………
सर्व पालकांनी लोकप्रतिनिधी तसेच बीडिओ यांना भौतिक सुविधा पुरविण्याबाबत निवेदन दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सध्या सावली तालुक्यात वाघाची दहशत असल्याने मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालक धस्तावत आहेत. त्यामुळे त्वरित भौतिक सुविधांची निर्मिती करावी.
– रेवनाथ भोयर सभापती शाळा व्यवस्थापन समिती
………………………………
एमआरजीएस फंडातून शौचालय, मुत्रीघर, संरक्षण भिंत या भौतिक सुविधा पुरवण्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत. येत्या आठवड्यात शौचालय व मुत्री घराचे बांधकाम सुरू करण्यात येईल.
– सुनिता मरसकोल्हे
गट विकास अधिकारी पंचायत समिती सावली
………………………………

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!
preload imagepreload image
07:32