*वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा- अविनाश पाल.यांची मागणी*
*वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा, ..अविनाश पाल.यांची मागणी*
*वनमंत्री नाम.सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन-
*सावली (बाबा मेश्राम)::तालुक्यातील.वाघाचे वारंवार हल्ले होत असुन आठवड्यात तीन लोकाना आपला जीव गमवावा लागला आहे, यात दोन शेतकरी व एक महिला मजुराचा बळी गेला, यात रुद्रापुर येथील बापुराव कांबळे,खेडी येथील स्वरुपा येलट्टीवार यांचा सलग बळी गेला तर आठवडाभरापुर्वी निलसनी पेठगाव येथील कैलास गेडेकर याचा बळी गेला त्यामुळे तालुक्यात भितीचे वातावरण पसरले आहे ,त्यामुळे वाघाचा तात्काळ बंदोबस्त करुन जंगलालगत असलेल्या गावांना तारेचे कुंपण करावे अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांनी राज्याचे वनमंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाने केली आहे.
तालुक्यात स्वत:चा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकरी, शेतमजुरांना काम करण्यासाठी जावे लागते,परंतु वाघाच्या दहशतीमुळे जीवन जगते कठीण झाले आहे,त्यामुळे तालुक्यातील जंगलाला लागुन असलेल्या रस्त्यावरील वनविभागाचे झाडे झुडपे साफ करावे,वनविभागाच्या परिसरात असलेल्या गावालगत जंगलात काटेरीतार कुंपण करण्यात यावे,या कुंपणामुळे वन्यप्राणी गावात शिरकाव करणार नाही ,या प्रकारच्या उपाययोजना निवेदनात नमुद करण्यात आल्या,सोबतच वाघाच्या हल्ल्यात मुत्यु मुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या परीवारातील व्यक्तीला शासकीय व कंत्राटी नौकरीसाठी प्राधान्य क्रमाने आरक्षीत करण्यात यावे,सरपण गोळा करणाऱ्या नागरिकांना वनविभागाकडुन गास सिंलेडरवर सुट देण्यात यावी,ते कमी पैशात गास खरेदी करतील, त्यामुळे जंगलात सरपण साठी जावे लागणार नाही,शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान करणाऱ्या रानडुक्कर ला मारण्याची परवानगी द्यावी, मागण्या मान्य करून न्याय द्यावी ,अशा मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजप तालुका अध्यक्ष तथा। ओबीसी जिल्हाध्यक्ष अविनाश पाल यांनी केली आहे…



