वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात वन्यप्राण्यापासुन नागरिकांना धोका वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याकडे लक्ष देतील का
ब्रेकिंग न्यूज
पहाटेला सुमारास शेताकडे गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला
वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात वन्यप्राण्यांपासुन नागरीकांना धोका, वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार याकडे लक्ष देतील का?
सावली तालुक्बायातील रुद्रापूर येथील बाबुराव बुधाजी कांबळे नामक व्यक्ती वय 65 वर्षे आज पहाटे गावाशेजारी असलेल्या शेताकडे जात अचानक पट्टेदार बाघाने हमला केला व त्यातच त्यांचा करून अंत झाला. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुल आणि चार नातवंड असा आप्त परिवार आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाघाचा हमला ही नित्याचीच बाब आहे. लोकांवर वाघ मोठ्या प्रमाणात हमले करत आहेत. असा एकही दिवस जात नाही की, वाघाने हमला केला नाही म्हणून, चंद्रपूर जिल्ह्यातील कुठे ना कुठे एकतरी घटना घडत असते.
वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात वन्य प्राण्यापासुन नागरिकांना धोका वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याकडे लक्ष देतील का असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक प्रश्न विंचारात आहेत.



