Vidarbh24News

Latest Online Breaking News

बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष पदी कैलाश कापगते.यांची निवड*

*बाळासाहेबांची शिवसेना तालुका अध्यक्ष पदी कैलाश कापगते.यांची निवड*

*सावली,(बाबा मेश्राम)*__. बाळासाहेबांची शिवसेना(शिंदे गट) या पक्षाची सावली तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली ,यात सावली तालुका अध्यक्ष पदी कैलाश कापगते यांची निवड करण्यात आली आहे,, सदर निवड ही पुर्व विदर्भ प्रमुख किरण पांडव यांनी केली आहे ,यावेळी चंद्रपूर जिल्हा प्रमुख नितीन मत्ते ,सह संपर्क प्रमुख बंडु हजारे यांची उपस्थिती होती..
बाळासाहेबाची शिवसेना (शिंदे गट) च्या संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा, तालुका ,कार्यकारिणी गठीत होत आहेत,,त्याचप्रमाणे सावली तालुक्यात सुध्दा बाळेसाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षाची तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली,तालुका अध्यक्ष कैलाश कापगते यांच्या निवडीने पक्ष संघटन वाढीसाठी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवता येईल असा वि्श्वास व्यक्त होत आहे,
कैलास कापगते हे सावली येथील रहिवासी आहेत ,तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक ,राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत.सावली तालुका ते परिचित आहेत, सामाजिक कार्यात नेहमीच ते अग्रेसर असतात.
आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडुन पक्ष संघटन वाढीसोबतच जनतेचे प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी आणि परिसरात विकासात्मक कामासाठी कायम प्रयत्नशील राहु असा विश्वास कापगते यांनी तालुका अध्यक्ष पदी निवडी झाल्या नंतर व्यक्त केला ,त्यांच्या या निवडीबद्दल संकेत कोनबत्तुलवार,तुळशिदास बानबले,शेंडे,विवेक भैसारे भाष्कर शेंडे सह अनेक कार्यकर्तानी अभिनंदन केले आहे…

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!