पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला शाखा जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप घाटे,यांची निवड
पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला शाखा जिल्हा उपाध्यक्ष पदी संदीप घाटे,यांची निवड
विदर्भ 24 न्यूज़ गडचिरोली
अकोला :- दिनांक 11 / 06 / 2020 अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेले संदीप हरिदास घाटे, यांची पोलीस बॉईज असोसिएशन अकोला जिल्हा शाखा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आसून. सन 2016 पासून संदीप घाटे हे पोलीस बॉईज असोसिएशनचे मूर्तिजापूर तालुका अध्यक्ष या पदावर काम करत होते. त्यांनी अकोला जिल्हा पोलीस अधिकारी / पोलीस कर्मचारी / तसेच त्यांचे कुटुंबीय यांच्या बऱ्याच समस्या शासनासमोर मांडून अकोला शहर व मूर्तिजापूर तालुक्यात अनेक मोर्चे काढून व आंदोलने करून तसेच अडचनीच्या वेळी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहून पोलीसांना व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून दिला आहे.संदीप घाटे यांचे अकोला जिल्ह्यातील सर्व स्तरातील व्यक्तीसोबत चांगले संबंध असून त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. त्यामुळे संदीप यांचे अतिशय निस्वार्थी व प्रामाणिक काम पाहून पोलीस बॉईज असोसिएशनच्या अकोला जिल्हा उपाध्यक्ष या पदावर बढती करून त्यांची नियुक्ती करण्यात आली असून अकोला जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
या निवडीबद्दल पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा.प्रमोद वाघमारे तसेच विदर्भ अध्यक्ष मा.शाहेदभाई सय्यद विदर्भ कार्याध्यक्ष :- भुवनेश्वर निमगडे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष गिरीश कोरामी,नागपूर जिल्हाध्यक्ष नोयल जोसेफ, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष सय्यदराजा मुजावर, सांगली जिल्हाध्यक्ष विशाल सगरे, पालघर जिल्हाध्यक्ष हितेश भट, अहमदनगर जिल्हाध्यक्ष नौशाद शेख,कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सतीश चव्हाण, सोलापूर जिल्हाध्यक्ष मनोज देवकर, धुळे जिल्हाध्यक्ष बॉबी वाघ,जळगाव जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, महाराष्ट्र उपाध्यक्ष शैलेश पांडव, मुंबई सरचिटणीस संजय डे, परभणी जिल्हाध्यक्ष शरद ठाकरस, हिंगोली जिल्हाध्यक्ष सातपुते,महिला आघाडी विदर्भ अध्यक्ष विधी सल्लागार ऍडव्होकेट सौ.रजनी देवतळे, यवतमाळ जिल्हाध्यक्ष सौ. कल्पना नागभीडकर, अमरावती जिल्हाध्यक्ष शीतल चव्हाण, अश्या विविध जील्ह्यात नियुक्त असून आदींनी त्यांचे स्वागत करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.



