Vidarbh24News

Latest Online Breaking News

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी पोलिसांनी पकडली 1 कोटी 12 लाखांची रोकड

गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी पोलिसांनी पकडली 1 कोटी 12 लाखांची रोकड

कोणत्या व्यवहारात वापरण्यात येनार होती? त्या रोकड़ चा व्यावहारिक बँकिंग किंवा पारदर्शक संबंध आहे का? याचा उलगडा अद्याप झाला नसुन त्यादिशेने आरमोरी पोलिसाचा तपास सुरु आहे,

विदर्भ 24 न्यूज
जिल्हाप्रतिनिधी गडचिरोली/
आरमोरी :– मिळालेल्या माहितीनुसार राज्यात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र नाकाबंदी असतानाही संशयास्पदरित्या1 कोटी 12 लाखांची रोकड घेऊन जाणाऱ्या वाहनास आरमोरी पोलिसांनी पकडले असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे . काल 11 जून रोजी दुपारी कोविड -19 च्या अनुषंगाने आरमोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आरमोरी – वडसा रोड मार्गावरील कोसा विकास केंद्र नाकाबंदी पॉईंट वर पोलीस नाईक पेंदाम , कंगाले , पोलीस शिपाई चापले , धांडे , होमगार्ड लांजेवार, हे नाकाबंदी करीत असताना आज गुरुवारी दुपारच्या सुमारास एम.एच. 35पी 9001 या क्रमांकाचे वाहन तिथे आले . या वाहनात संजयकुमार किशोर टेहट ( 54 ) , स्नेहल बिपीन पटेल ( 45 ) , समीर कयूम कुरेशी ( 35 ) सर्व रा. रामनगर जिल्हा गोंदिया हे उपस्थित होते . पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता,त्यात मोठी रोकड आढळून आली,त्यामुळे स्थानिक नाक्यावर उपस्थित पोलिसांनी याबाबत आरमोरी पोलिस ठाण्यात माहिती दिली. या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक चौहाण तिथे पंचासोबत हजर झाले. यावेळी आरमोरीचे तहसीलदार दहाट व बँकेच्या शाखा व्यवस्थापकासमोर वाहनातील रोकडची मोजमाप करण्यात आली. त्यात ती रक्कम 1कोटी 12 लाख एवढी होती, हे स्पष्ट झाले,ही रक्कम पंचासमक्ष पंचनामा करून ती रक्कम जप्त करण्यात आली आहे,ती कोणत्या व्यवहारात वापरण्यात येत होती , त्याचा व्यावहारिक बँकिंग किंवा पारदर्शक संबंध आहे का,याचा उलगडा अद्याप झालेला नाही त्यादिशेने आरमोरी पोलिसाचा तपास सुरु आहे,पुढील तपास चालू असून चौकशीअंती योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आरमोरी पोलिसांनी दिली आहे .

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!