जुबिली शाळेच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स ट्रेन्स स्टोरला क्षेत्रभेट”*
*”जुबिली शाळेच्या विद्यार्थ्यांची रिलायन्स ट्रेन्स स्टोर ला क्षेत्रभेट”*
चंद्रपूर- जिल्हा परिषद जुबिली हायस्कूल तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर येथील वर्ग 9 ते 12 वी च्या व्यवसाय अभ्यासक्रमातील *रिटेल विषय* शिकवनी घेत असलेल्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट शुक्रवार दिनांक 25 नोव्हेंबर २०२२ ला चंद्रपुरातील रिलायन्स ट्रेन्डस् स्टोअर या फॅशन दुकानात आयोजित केली गेली. “विद्यार्थ्यांचे पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक कौशल्य सुद्धा विकसित होणे आवश्यक आहे” त्याकरिता विषय शिक्षक श्री. पवन खनके सर यांनी विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट घडवून आणली. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन वाढावा या उद्देशाने समग्र शिक्षा अभियानांतर्गत व्यवसाय शिक्षण विभागातर्फे या क्षेत्रभेटीचे नियोजन व्यवसाय प्रशिक्षक श्री पवन खनके यांनी केले होते.
या क्षेत्रभेटी दरम्यान स्टोअर चे प्रबंधक श्री. अजय सिंगणापूर यांचे मार्गदर्शनात कुमारी सोनाली मॅडम आणि प्रकाश सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. सदर क्षेत्रभेट प्राचार्य श्रीमती वाघमारे मॅडम यांच्या नेतृत्वात रिटेल विषय शिक्षक श्री. पवन खनके यांनी आयोजित केली होती. त्यात सरकारी श्री गोविंद बांसपाल तसेच सर्व शिक्षकांचे आणि पालकांचे सहकार्य लाभले.