Vidarbh24News

Latest Online Breaking News

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली येथे मतदार नोंदणी शिबीर ….

औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावली येथे मतदार नोंदणी शिबीर ….
सावली ( लोकमत दुधे )
तहसील कार्यालय सावली व औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावली यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक 29/11/2022 रोजी नवीन व भावी मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत नोंदविण्याकरिता शिबीर पार पडले.
सदर शिबीर तहसीलदार परीक्षित पाटील यांचे मार्गदर्शनात व नायब तहसीलदार सागर कांबळे, शिल्पनिर्दैशक बारशिंगे, यांचे उपस्थितीत पार पडले. यावेळी कांबळे यांनी मतदार नोंदणी प्रक्रिया व मतदार नोंदणीचे महत्व याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे वयाची 18 वर्षे पूर्ण झाली आहेत तसेच ज्यांना त्यांचे वयाची 18 वर्षे 1 ऑक्टोबर 2023 रोजी पूर्ण होणार आहेत अशा सर्वांनी मतदार नोंदणी करण्याकरिता अर्ज सादर करण्याचे आवाहन केले.
” एक मत एक मुल्य “यावरून मताची किंमत लक्षात घेऊन ज्या काही नवीन व भावी मतदार यांनी मतदार नोंदणी करण्यासाठी नोंदणी फार्म भरुन आपली मतदार नोंदणी करावी,यामुळे आपल्याला फक्त वेगवेगळ्या होणा-या निवडणुकीसाठीच महत्त्वाचे नाही तर विविध योजना, विवाह नोंदणी, यासाठी सुद्धा मतदार ओळख पत्राची आवश्यकता असते ,त्यामुळे संविधानामुळे आपल्याला जो मतदानाचा अधिकार मिळालेला आहे ,त्या अधिकाराचा योग्य वापर करुन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार नोंदणी करण्याचे यावेळी माहिती देण्यात आली ……

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!