विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात संविधान दिन साजरा प्रतिनिधी-
विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात
संविधान दिन साजरा प्रतिनिधी-
०
आज. २६ नोव्हेंबर ‘संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान दिन विश्वशांती विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहान साजरा करण्यात आला. सर्वप्रथम संपूर्ण सावली नगरीत प्रभात फेरी काढण्यात आली. संविधानाबर आधारीत नारे देताना पाहून संपूर्ण सावली नगरी दुमदुमली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मान. राजाबाळ पाटील संगिडवार हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक आर० एस. मुप्पावार सर पर्यवेक्षक ए. के. राऊत सर, एस.आर. मेश्राम सूपले सर होते. तर प्रमुख मागदर्शक म्हणून डि.पी. दूधे सर यांनी संविधानाचे महत्व, अधिकार व कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थी- विद्यार्थिनींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन गेडाम सर तर आभार जिवतोडे सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.



