अखिल भारतीय मादगी समाज संघटनेकडून अतिक्रमण धारकांना बेघर करु नये यासाठी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात महसूल विभागाच्या गावरान अतिक्रमण जागेत पिढ्या न पिढ्या वास्तव्यास असणारे नागरिकांना जागा खाली करण्याचे नोटीस मिळत आहेत हे अतिक्रमण हटवू नये याबाबत म.मुख्यमंत्री यांना म.तहसीलदार साहेब सावली मार्फत अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे जिलाध्यक्ष अनिल परशुराम बोटका वार तसेच प्रदेश महासचिव आकाश आलेवार आणि पा थ री चे अन्याय ग्रस्त नागरिक उपस्थित होते.
अनेक पिढ्यांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत असलेल्या कुटुंबाना अतिक्रमण हटविण्याची नोटीस तहसीलदार सावली यांनी दिल्याने धास्तावलेल्या अतिक्रमनधारकांनी तहसिल कार्यालयात दिवसभर गर्दी अतिक्रमण हटवू नये अशा मागणीचे निवेदन पेंढरी, मुंडाळा, चारगाव, चकपिरंजी, खेडी, पाथरी, भारपायली येथील अतिक्रमनधारकांनी तहसीलदार सावली यांचेकडे निवेदने दिले.
सावली तालुक्यातील १४ गावातील ४६४ कुटुंब अनेक वर्षांपासून गावठाण व महसूल जागेवर घरे बांधून निवास करीत आहेत परंतु नुकतेच तहसीलदार सावली यांचेकडून सदर अतिक्रमण धारकांना नोटीस बजावली असून २२ नोव्हेंबर पर्यंत अतिक्रमण न हटविल्यास प्रशासनाकडून हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे यामुळे अतिक्रमनधारक धास्तावले आहेत. सदर जमिनीवर पक्के घरे बांधकाम झालेले आहे, त्याच जागेवर शासनाकडून आवास योजनेची घरकुल बांधकाम झालेले आहे, त्याच वस्तीत शासकीय योजनेतून रस्ते, नाली व शासकीय इमारतीचे बांधकाम झालेले आहेत मात्र नुकतेच तहसिलदार सावली यांनी नोटीस पाठविल्याने अतिक्रमनधारकांवर बेघर होण्याची पाळी आहे. त्यामुळे अतिक्रमण हटवू नये असे निवेदन तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील अतिक्रमनधारकांनी दिवसभर गर्दी करीत निवेदने दिले.



