अखिल भारतीय मादगी समाज संघटना कडून पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना निवेदन
आज दिनांक १५/१०/२०२२ ला अखिल भारतीय मादगी समाज संघटना (म.राज्य.) जिल्हा चंद्रपूर चे वतीने सात आठ वर्षापासून अस्वच्छ शिष्यवृत्ती आपल्या पाल्यांना मिळत नाही आहे ती यावर्षी पासून दरवर्षी न चुकता देण्यात यावी या संदर्भात पत्र देण्यात आले आणि काही सामाजिक समस्या चे निराकरण करण्यात यावे त्यासाठी प्रत्यक्ष संघटनेचे शिष्टमंडळ मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेबांना भेटले.हे पत्र देताना विजय गंगासागर चंद्रपूर शहर अध्यक्ष, अनिल बोटकावार जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर, किशोर पगडपल्लीवार प्रदेश उपाध्यक्ष, सुनील कोरेवार सावली तालुका अध्यक्ष ,रमेश लाटेलवार तालुका उपाध्यक्ष, भीमरावजी इटकलवार मुल तालुका अध्यक्ष, रवींद्र बोलीवार माजी उपसभापती सावली, सुनील नलुरवार तालुका सहसचिव, महेश देवताले निमगाव विभागीय अध्यक्ष, विनोद गोरडवार व रोहित आलेवार तालुका कोषाध्यक्ष, गजू आलेवार जिल्हा कोषाध्यक्ष,अमर गोरडवार सदस्य तसेच बाळू गोरडवार सदस्य उपस्थित होते.



