Vidarbh24News

Latest Online Breaking News

*पंतप्रधान किसान सन्मान(PMKSY)योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्याना किसान क्रेडीट कार्ड प्रदान करणेबाबत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन*..

चंद्रपूर- केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने मा.मुख्यमंत्री महोदय व मा.उपमुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील पी.एम.किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्याना किसान क्रेडीट कार्ड प्रदान करण्याचे उदिष्ट 100 टक्के पुर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. अनुषंगाने पी.एम.किसान सन्मान योजनेतील पात्र लाभार्थ्याना किसान क्रेडीट कार्ड प्रदान करणेकरीता *तालुकानिहाय मेळावा दि.11/10/2022 रोज मंगळवारला वेळ सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यत* तालुक्यांच्या खालील ठिकाणी आयोजित केलेला आहे.

1) *कोरपना* – पंचायत समिती हॉल, कोरपना
2) *जिवती* – पंचायत समिती हॉल, जिवती
3) *गोंडपिपरी* – पंचायत समिती हॉल,गोंडपिपरी
4) *राजुरा* – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा सभागृह,राजुरा
5) *बल्लारपूर* – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शाखा सभागृह,बल्लारपूर
6) *चंद्रपूर* – पंचायत समिती भवन,चंद्रपूर
7) *भद्रावती* – पंचायत समिती हॉल, भद्रावती
8) *वरोरा* – पंचायत समिती हॉल,वरोरा
9) *चिमूर*- राईस मिल शेतकरी भवन, चिमूर
10) *नागभिड* – कृषि उत्पन्न बाजार समिती सभागृह, नागभिड
11) *ब्रम्हपूरी* – विविध कार्यकारी सह.संस्था सभागृह,ब्रम्हपूरी
12) *सिंदेवाही* – पंचायत समिती हॉल,सिंदेवाही
13) *मूल* – पंचायत समिती हॉल,मुल
14) *सावली* – तहसिल कार्यालय हॉल,सावली
15) *पोंभुर्णा* – सामाजिक सभागृह,नगरपंचायत पोंभुर्णा

*आयोजित मेळाव्यामध्ये ज्या शेतक-यांकडे किसान क्रेडीट कार्ड सुविधा नाही अशा शेतक-यांना एक पानी कर्जमागणी अर्जाचे वितरण करण्यात येवून शेतकऱ्यांकडून अर्ज जमिनधारणेबाबतचा 7/12, नमुना 8-अ व स्वयंघोषणापत्रासह अर्ज प्राप्त करून संबंधित बँक आवश्यक तपासणी करून पी.एम.किसान लाभार्थीस के.सी.सी. उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जिल्हातील शेतक-यांनी दि.11/10/2022 रोजी तालुक्यांच्या मेळाव्याच्या ठिकाणी जावुन किसान क्रेडीट कार्ड सुविधा घेण्याबाबत जिल्हा प्रशासनाच्या व सहकार विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे*

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!