वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सावली शाखेचा चौथा वर्धापनदिन थाटात साजरा ..
वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., सावली शाखेचा चौथा वर्धापन दिन थाटात साजरा ..
दि. १ ऑगस्ट – बँकिंग क्षेत्रात सावली तालुक्यातील नागरिकांना सलग तीन वर्ष उत्तम सेवा देणारी *वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.* शाखेचा चा आज चौथा वर्धापन दीन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.
बँकिंग क्षेत्रात अग्रेषित असलेली *वैनगंगा नागरी सहकारी पतसंस्था* सलग तीन वर्ष आपल्या खातेदारांना उत्तम सेवा देऊन सावली तालुक्यात नावारूपास आलेली आहे. या पतसंस्थेत अनेक सभासद, खातेदार आहेत.
आज या पतसंस्था चा चौथा वर्धापनदिन असल्याने पतसंस्था चे ऑफिस पूर्णपणे सजविण्यात आले, पतसंस्था चे अध्यक्ष विजय कोरेवार यांचे हस्ते पूजा करण्यात आली. पतसंस्था कर्मचारी, सभासद, खातेदारांना, सर्व एजंट यांना मिठाई वाटून वर्धापण दीन साजरा करण्यात आला. अध्यक्ष विजय कोरेवार व पतसंस्था चे व्यवस्थापक नरेंद्र राचेवार यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. संचालन रोशन शिंगरेवार तर आभार अभिनव नवले यांनी मानले.
यावेळी पतसंस्था चे सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वृंद, सभासद, खातेदार, एजंट उपस्थित होते.



