Vidarbh24News

Latest Online Breaking News

“बुद्धमं.. शरनंम ..गच्छामीने..” दुमदुमले मारेगाव शहर

• शांतीरथ ठरला लक्षवेधी

•बुद्ध पौर्णिमे निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

मारेगाव:- जय भीम उत्सव समितीच्या वतीने मारेगाव येथे एकदिवसीय विविध कार्यक्रम घेवुन तथागत गौतम बुद्ध जयंती मोठया थाटात साजरी करण्यात आली.यात शहरातून काढण्यात आलेल्या कँडल मार्च चा शांतीरथ लक्षवेधी ठरला तर बुद्धमं शरनंम गच्छामीच्या घोषणेने मारेगाव शहर दुमदुमले.

यात सकाळी 9 वाजता येथील धम्मराजीका बुद्ध विहारात तथागत गौतम बुद्धाच्या मुर्तीला व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना देवुन अभिवादन करण्यात आले. तर 10 वाजता आयु.रमेश तेलंग यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संस्कार पाठाची शिकवण किती आवश्यक आहे? या विषयावर जाहीर व्याख्यान चा कार्यक्रम पार पडला.तसेच केवळ साडे पाच वर्षाचे बाल वक्ते स्वर्णीत गौरव चिकाटे यांनी गौतम बुद्धाचा जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन केले.

 

दरम्यान धम्मराजीका बुद्ध विहाराच्या निर्मानासाठी प्रा.संजय तेलतुंबडे याचे मोलाचे योगदान असल्याने तसेच डॉ.सुभाष इंगळे व डॉ. अर्चना देठे (इंगळे) यांनी कोरोना काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशंसनीय कार्य केल्याबद्धल यांचा सुध्दा स्वपत्नीक सत्कार उत्सव समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तर सायंकाळी 6 वाजता शहरात “युद्ध नको बुद्ध हवा” संदेश पोहचवण्यासाठी रथावर गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवून “शांतीरथ” कँडल मार्च काढण्यात आले.यावेळी शहरात बुद्धमं शरनंम गच्छामि च्या घोषणेने मारेगाव शहर दुमदुमले.रथावर असलेली गौतम बुद्धाची आकर्षक मोठी मुर्ती लक्षवेधी ठरली.तर 7 वाजता समूह भोजन तर दरम्यान ऑर्केस्ट्रा स्वरधारा प्रस्तुत “गाथा बुद्ध भीम गीतांची” या संगीतमय कार्यक्रम पार पडला.यात नागेश रायपुरे, कु.वैष्णवी चांदेकर, आचल पवार यांनी सादर केलेल्या बुद्ध भीम गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष धर्मराज सातपुते होते तर संचालन गौरव चिकाटे यांनी केले तर आभार गौतम मालखेडे यांनी मानले
या कार्यक्रमासाठी नगरसेवक हेमंत नरांजे,गौरव चिकाटे, नागेश रायपुरे, वसुमित्र वनकर,सुदर्शन पाटील,ओमप्रकाश पाटील,निलेश तेलंग,विनायक डोहणे, काटकर,सुवर्णा नरांजे,कांचन धोपटे,सपना वनकर,नूतन तेलंग,मीना दिगाडे,शोभा दारुंडे आदी भीम उत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!