Vidarbh24News

Latest Online Breaking News

पहापळ येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणी मनसेचा 19 में रोजी मारेगावात धडक मोर्चा

• चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी तमाम नागरिकांना मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन

मारेगाव 17 मे :- तालुक्यातील पहापळ येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणी 19 में रोज गुरवारला तहसील कार्यालय वर विविध मागण्या घेवून धडक मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर प्रकरण हे सरकारी पक्षा तर्फ ऍड.उज्वल निकम यांचेकडे देण्यात यावे.सदर खटला फास्ट ट्रेक मध्ये चालवण्यात यावा. नराधम आरोपी मारोती भेंडाळे(30)याला फाशीची शिक्षा देण्यात यावी.आदी मागण्या घेवून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने 19 मे रोज गुरवार सकाळी 11 वाजता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा धडक मोर्चा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर यांचे मार्गदर्शनात मनसेच्या महिला जिल्हा अध्यक्ष अर्चना बोदाडकर,महिला जिल्हा उपाध्यक्ष अंजुम शेख,जिल्हा उपाध्यक्ष संतोष रोगे यांचे नेतृत्वात निघणार आहे.

या मोर्चाची सुरवात येथील मार्डी चौकातून मुख्य मार्गाने मार्गक्रमन करत थेट तहसील कार्यालयवर धडकनार आहे.चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी परिसरातील तमाम नागरीकांनी या धडक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू भाऊ उंबरकर यांनी केले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!