Vidarbh24News

Latest Online Breaking News

राजुरा विधानसभा क्षेत्रातील खाणींमध्ये स्थानिकांना रोजगार द्या अशी सुरज ठाकरे यांची मागणी

विदर्भ २४ डिजिटल न्यूज राजुरा तालुका प्रतिनिधी आशिष यमनुरवार

राजुरा विधानसभा क्षेत्रातील खाणींमध्ये स्थानिकांना रोजगार द्या अशी सुरज ठाकरे यांची मागणी.

राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये गाडेगाव,वीरुर, पोवनी, सास्ती, धोपटाळा, गोवरी, इत्यादी भागांमध्ये सुरू असलेल्या वेकोली अंतर्गत येणाऱ्या खाणींमध्ये कंत्राटी पद्धतीने निर्माण होत असलेल्या रोजगारावर राजुरा विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना प्रथम प्राधान्य देण्याकरता सुरज ठाकरे यांनी आज,१७/०५/२०२२ रोजी विकोली उपमहाप्रबंधक वनी क्षेत्र, यांचेकडे मोठ्या संख्येने बेरोजगारांना घेऊन जाऊन निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली आहे.

या निवेदनावर वेकोलि अधिकाऱ्यांनी सकारात्मक भुमिका दाखविली असून येत्या काही दिवसांमध्येच राजुरा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या मध्यस्थीने बैठक घेण्याचे निमंत्रण दिले आहे या बैठकीच्या माध्यमातून भागातील सुशिक्षित तरुण बेरोजगारांना काम करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहेत तसेच ज्यांना सदर काम येत नाही त्यांना प्रशिक्षण देखील देण्याची तयारी वेकोली ने दर्शविली असल्याने वेकोलिच्या या भूमिकेचे समस्त तरुण बेरोजगारांनी व स्वाभिमान पार्टीचे सुरज ठाकरे यांनी स्वागत केले आहे.

राजुरा विधानसभा क्षेत्रांमध्ये सिमेंट उद्योग व कोळसा खाणींचे जाळे पसरले असताना देखील विधानसभा क्षेत्रातील तरुणांच्या हाती काम नाही व तरुणांना काम मिळावे याकरता जनप्रतिनिधी देखील प्रयत्नशील नाहीत. असा आरोप सुरज ठाकरे यांनी या ठिकाणी केला. परंतु आपण गेल्या अनेक वर्षांपासून या भागामध्ये निर्माण होणारा रोजगार हा या भागातील तरुणांना मिळावा यासाठी लढा लढतो आहे. व जोपर्यंत स्थानिक तरुणांच्या हाती रोजगार लागणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील हे देखील त्यांनी या ठिकाणी सांगितले आहे..

वेकोलिच्या अधिकाऱ्यांनी उचललेल्या सकारात्मक पाऊल याचा निश्चितच फायदा हा भविष्यामध्ये बेरोजगारांना मिळेल असे सुरज ठाकरे बोललेले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!