शेतात जागलीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा संशयीतरित्या आढळला मृत्यूदेह
•घातपाताची शक्यता,डोर्ली येथील घटना…..
मारेगाव (9.मे) :- शेतात जागलीसाठी गेलेल्या शेतकऱ्याचा शेतातच संशयित रित्या मृत्यूदेह आढळल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील डोर्ली येथे आज 9 मे रोजी सकाळी 7 वाजताच्या दरम्यान उघडकीस आले.विलास करनुजी गोहोकर (50)रा.डोर्ली असे मृतकाचे नाव आहे.
प्राप्त माहिती नुसार मृतक विलास गोहोकर यांचे कडे डोर्ली गावालगत चार एकर शेतजमीन आहे.मृतक रात्री शेतात जागली साठी गेला असता,सकाळी 7 वाजता दरम्यान मृतकाचा भाऊ शेतात गेला असता संशयित रित्या मृत्यूदेह आढळला.
मृतकाचे गळ्यावर आवळल्या सारखे वळ दिसल्याने घातपाताची शक्यता वर्तविला जात आहे.मृतकाचे मागे एक मुलगा,मुलगी मोठा आप्तपरीवार आहे.वृत्त लिहिपर्यंत घटनेचा पंचनामा मारेगाव पोलीस करत होते.