ग्रा.प.चि.बोटोनीच्या सरपंच पदी प्रवीण वनकर

• मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे सरपंचा सह दोन सदस्य अपात्र
मारेगाव:- विहित मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे तालुक्यातील चि. बोटोनी ग्राम पंचायतच्या सरपंचासह दोन सदस्य अपात्र घोषित झाले.यामुळे येथील उपसरपंच प्रवीण वनकर यांची उपसरपंच पदावरून थेट सरपंच पदावर वर्णी लागली.
तालुक्यातील पेसा अंतर्गत असलेली ग्रामपंचायत चि. बोटोनी ची सार्वत्रिक निवडणूक 2021 मध्ये घेण्यात आली.यात निवडणूक आयोगाने ठरवलेल्या विहित मुदतीच्या आत येथील महिला सरपंचा व दोन सदस्या यांचे विरोधात येथील माजी सरपंच महादेव सिडाम यांनी तक्रार दाखल केली होती.
निवडणूक प्रशासनाने या तक्रारीची तत्काळ दखल घेत,निवडणूक आयोगाच्या नियमाची अंमलबजावणी करत अपात्रतेची कारवाई केली.या कारवाईत येथील महिला सरपंचा सौ.सुनिता जुमनाके यांचे सह सदस्या अश्विनी मडावी,सुवर्णा ठक यांना अपात्र घोषित करण्यात आले.
येथील महिला सरपंचाला विहित मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र निवडणूक प्रशासन कडे सादर न केल्यामुळे कारवाईला सामोरीजावे लागले व सरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले.यामुळे येथील उपसरपंच प्रवीण वनकर यांची उपसरपंच पदावरुन थेट सरपंच पदावर बढती झाली.प्रवीण वनकर हे नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याने ते नक्कीच गावाचा विकास साधेल अश्या प्रतिक्रिया परिसरात उमटत आहे.