Vidarbh24News

Latest Online Breaking News

पुलाचा काठावरून घसरला अन्…..नदीत पडला……!!!!!!!!.

•निर्गुडा नदीची घटना…

वणी (२६. एप्रिल ) :- शहरातील एका अल्पवयीन मुलाचा निर्गुडा नदीचा काठावरून घसरून पडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना काल दिनांक २५ एप्रिलला रात्री ८ वाजताचा सुमारास घडल्याची माहिती उघडकीस आहे.ही घटना वणी शहरात वाऱ्यासारखी उडाली तर समस्त युवकांची एकच झुंबड वणी येथील एका खाजगी रुग्णलयात काल रात्री दिसून आली. 

सविस्तर ,सागर राजू ठावरी (वय १७) रा. गुरूनगर असे मृत अल्पवयीन मुलाचे नाव आहे.हा शहरातीलच एका नावाजलेल्या कॉलेजचा विद्यार्थी होता. मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल सागर व त्याचे काही मित्र निर्गुडा नदीचा पुलावर गेले. काहीं वेळ गप्पा गोष्टी रंगल्या तेव्हढ्याच सागर पुलाच्या कठड्यावर बसण्याचा प्रयत्न  करताच त्याचा तोल गेला आणि तो नदीचा खोल असलेल्या दरीत खाली कोसळला.तो नदीत पडल्याचे कळताच त्याच क्षणी मित्रांनी त्याला पाण्यातून काढले व शहरातील एका खाजगी रुग्णलयात तात्काळ दाखल केले.वणी पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर धाव घेतली व संपूर्ण माहिती घेतली असता या मागील पोलीस चौकशी सुरू आहे.सागरचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनाकरीता असता काल ठेवले असता आज त्यावर शविच्छेदन दि. 26 एप्रिलला सकाळी 11 वाजता झाले आहे व त्याचा मृतदेह त्यांचा कुंटूबियाना सोपिण्यात आले आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!