वणी युवासेनेने ” थाली बजाओ …..खुशीया मनाओ ” या नाऱ्याने भाजपाला लगावला टोला…!!!!!

●महागाई विरोधात युवासेनेचे लक्षवेधी आंदोलन
वणी (3 एप्रिल) :- “देश चलाये संता बंता…बेहाल हो गई जनता, मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा देत वाढती महागाई विरोधात मोदी सरकारचा निषेध शिवाजी महाराज चौकात युवा सेनेच्या वतीने रविवार दिनांक 3 एप्रिलला आंदोलन छेडण्यात आले.वाढत्या महागाईबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याकरिता थाळी बजाव आंदोलन येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकात दि.३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजता युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, युवसेना सचिव वरून सरदेसाई यांच्या आदेशानुसार यवतमाळ जिल्ह्यातील युवासेना विस्तारक दिलीप घुगे, शिवसेना जिल्हाप्रमुख विश्वास नांदेकर यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत चचडा, यांच्या उपस्थित युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
यावेळी शिवसेना शहप्रमुख राजु तुराणकर, महेश चौधरी, मोंटू वाधवानी,बंटी येरणे, कुणाल लोणारे, प्रफुल बोरडे, स्वप्नील ताजने, निलेश करटबुजे, शुभम बोबडे, सचिन मांडवकर, केतन चिकटे,अमृत फुलझले, अनुप चटप,अभिजित सुरसे,राजू लोणारे, साहिल लांजेवार, सूरज मडावी,राजू गोलाईत,
अभी गोलाईत, चेतन शेंडे,निखिल सोनटक्के, सचिन पाटील, हरीश शेंडे, हनुमान पायघन,विठ्ठल पाचभाई उमेश भोंगळे, प्रवीण वरारकर,युवासेना पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.