Vidarbh24News

Latest Online Breaking News

चीमुर येथील उपविभागीय अधिकारी( SDM) यांच्या वाहन चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या

चीमुर येथील उपविभागीय अधिकारी( SDM) यांच्या वाहन चालकाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

मृत्यूचे कारण अध्यापही गुपीतच..

चिमूर पोलीस स्टेशन चे अधि/कर्मचारी यांचे समोर तपासाचे मोठे आव्हान..

चिमूर : – चिमूर तहसील येथेल उपविभागीय अधिकारी ( SDM)यांच्या वाहनाचे शासकीय चालक या पदावर कार्यरत असणारे दत्तात्रय महादेव कळथे वय 37वर्षे हे अंदाजे 3 वर्षांपासून चालक पदावर कार्यरत होते.त्यांच्यावर एक वर्षाअगोदर काही लोकांनी तहसील कार्यालय समोर पेट्रोल टाकुन जाळण्याचे प्रयत्न असा प्राणघात हल्ला केल्याचे सुध्दा समजते,ते शांत स्वभावाचे होते व नियमितपणे चालकाचे काम कर्तव्यदक्ष पणे हाताळायचे. ते चिमूर तहसील येथील ट्रेजरी ऑफिस ला लागून असलेल्या तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानी राहात होते. त्याच ठिकाणी दिनांक.08/06/2020 त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.हे प्रकरण सकाळी 10 ते 11 वाजताच्या दरम्यान घडले. मेस वाल्यानी निवासस्थानी दिनांक.07 जून ला सायंकाळी जेवणाचा डब्बा दिला व दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा निवासस्थानी जेवणाचा डब्बा दुपारी 12वाजता नेऊन दिला असता. वारंवार आवाज मारून दार न उघडल्याने दार का उघडत नाही याबद्दल तहसील च्या कर्मचाऱ्यांना डब्बे वाल्यानी सांगितले तसेच काही अधिकारी निवासस्थानी जाऊन आवाज मारू लागले व दार न उघडले असता आतून दार लावून होते. म्हणून दार तोडले आणि अधिकारी यांनी बघितले कि वाहन चालक गळफास घेऊन फाशी लागले आहे.हि वार्ता तहसील कार्यालयात पसरता सर्वत्र खळबळ माजली.मृतकाचा परिवार हा निवासस्थानी नव्हता व चिमूर पोलिसांना माहिती दिली. मृतदेह खाली उतरविले आणि शव विच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे दाखल करण्यात आले. मृत्यूचे कारण अध्यापही समोर आले नसून चिमूर पोलीस स्टेशन चे अधि/कर्मचारी पुढील तपास करीत आहे.व हे निवासस्थान चिमूर तहसील चे तहसीलदार यांच्याकरीता नियोजित होते. परंतु तहसीलदार निवासस्थानी राहत नसल्याने उपविभागीय अधिकारी यांच्या चालकास ते निवासस्थान रहायला दिले होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!