Vidarbh24News

Latest Online Breaking News

चंद्रपूर कोरोना अपडेट

चंद्रपूर जिल्हातील बाधीताची
संख्या पोहचली ४२ वर

महेश काहीलकर / विदर्भ 24 न्युज

शहर प्रतिनिधी, चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काल मंगळवारी रात्री आणखी तीन नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ४२ झाली आहे. नवीन तीनही रुग्ण बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे पॉझिटिव्ह ठरले आहेत.
    जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी तालुक्यातील जुगनाळा गावातील ४३ वर्षीय एका बाधितांची ३३ वर्षीय पत्नी व पाच वर्षाचा मुलगा संपर्कातून पॉझिटिव्ह झाला आहे. या बाधितांना चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
 अन्य एक बाधित ब्रह्मपुरी तालुक्यातील बरड किन्ही येथील २२ वर्षाचा युवक असून अड्याळ टेकडी येथील बाधीताच्या संपर्कातील आहे. संस्थात्मक अलगीकरण कक्षात असलेल्या या युवकाला उशीरा लक्षणे दिसायला लागली. त्यामुळे त्याचे स्वॅब घेण्यात आले होते.
    चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधीत ), १३ मे ( एक बाधीत) २० मे ( एकूण १० बाधीत ) २३ मे ( एकूण ७ बाधीत ) व २४ मे ( एकूण बाधीत २ ) २५ मे ( एक बाधीत ) ३१ मे ( एक बाधीत ) २जून ( एक बाधीत ) ४ जून ( दोन बाधीत ) ५ जून ( एक बाधीत ) ६जून ( एक बाधीत ) ७ जून ( एकूण ११ बाधीत ) आणि ९ जून ( एकूण ३ बाधीत )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधीत ४२ झाले आहेत.आतापर्यत २३ बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ४२ पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता १९ आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!