वेश्या व्यवसायावर धाड – चंद्रपूर
जगन्नाथबाबा नगरातील वेश्या व्यवसायावर धाड
मुख्य महिलेसह तिघांना अटक
महेश काहीलकर/विदर्भ 24 न्युज
शहर प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर-येथील जगन्नाथ बाबा नगर येथे एका घरात बरे दिवसापासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर रामनगर पोलिसांनी धाड टाकून तिघ्यांना ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही सोमवार ला सायंकाळी करण्यात आली.
या प्रकरणी ताब्यात घेतल्यानं मध्ये एक महिला, एक युवतीसह दलाल शेख इरफान शेख अहमद (२६) रा. जलनागर यांचा समावेश आहे. सदर घरात मागील अनेक दिवसा पासून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती रामनगर पोलिसांचा गुन्हे शोध पथकाला मिळाली. सोमवारी सायंकाळी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून या व्यवसायावर धाड टाकली .
उचभ्रू समजल्या जाणाऱ्या या परिसरात असा व्यवसाय उघडीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.ही कार्यवाही एसडीपीओ शिलवंत नांदेडकर यांचा मार्गदर्शनात प्रभारी पोलीस निरीक्षक शेवाळे, एपीआय मलिक, पोलीस उपनिरीक्षक पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, यांचा सह गुन्हे शोध पथकाने केली.


