Vidarbh24News

Latest Online Breaking News

महाराष्ट्रातील वाजंत्री आणि बँड वाजवणाऱ्या समाजातील कुटूंबाना आर्थिक सहाय्य द्या..

महाराष्ट्रातील वाजंत्री आणि बँड वाजवणाऱ्या समाजातील कुटूंबाना आर्थिक सहाय्य द्या..

 अखिल भारतीय मादगी समाज संघटने चे मुख्यमंत्र्यांना निवेदन

गोंडपिपरी…
दिनांक:-08/जून
महाराष्ट्रात सध्या कोरोना (कोवीड-१९)च्या काळात मादगी, मातंग तसेच तत्सम व्यवसाय करणाऱ्या जातीची परिस्थिती अत्यंत भिषण व हालाखीची झालेली आहे. मार्च ते जून या कालावधीत मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे, लग्न समारंभ होत असतात. परंतु कोरोना प्रसंग लक्षात घेत सरकारनी या सर्व समारंभावर बंदी घातली आहे. परिणामी वाजंत्री व बँड वाजवून चार पैसे कमावणारा हा वर्ग पूर्णपणे निरुद्योगी झालेला दिसत असून आर्थिक टंचाईला सामोरे जात आहे. आज घडीला मय्यताला सुध्दा कोणी बोलवायला तयार नाहीत. या समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच जास्त प्रमाणात अवलंबून असतो, परंतु आज रिकाम्या हाताला काम नसल्याने मादगी समाजाच्या घरी उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे.

मादगी समाजाच्या उत्थानाकरीता अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे, संकटकाळी या समाजाला मदत करणेच हा या महामंडळाचा मुख्य हेतु असुन या बिकट परिस्थितीत तरी या महामंडळाच्या माध्यमातून समाजाला आर्थिक मदत मीळणे अपेक्षित आहे. फिजीकल डिस्टंन्सींग मुळे काम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या माध्यमातून शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून मादगी समाज तसेच तत्सम समाजाला अनुदान सुरू करावे अशी मागणी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्याना दिलेल्या निवेदनातुन करण्यात आली आहे.

भविष्यात प्रत्येक कुटूंब स्वतःच्या पायावर उभे झाले पाहिजे, यासाठी व्यवसाय उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विद्यमान सरकारने अनेक महत्वाचे व समाजाभिमुख निर्णय घेतलेले असल्याने आत्ताच्या परिस्थितीत तातडीने प्रती कुटूंब ५०००रूपये पर्यंतची मदत अण्णाभाऊ साठे महामंडळाकडून उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सुध्दा या निवेदनातुन करण्यात आली आहे.मा तहसीलदार, तहसील कार्यालय, गोंडपिपरी तहसीलदारामार्फतीने मा.ना.श्री. उध्दवरावजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री, मंत्रालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना निवेदन देण्यात आले असून याप्रसंगी अखिल भारतीय मादगी समाज संघटनेचे विदर्भाध्यक्ष मा.राजेश डोडिवार,गोविंदा कामरेवार, प्रदेश संघटक, विश्तारी इटकेलवार, प्रमोद लिंगमपल्लीवार, जनार्धन देवतळे ,ऋतिक देवतळे इत्यादी पदाधिकारी व समाजबांधव तालुका पदाधिकारी उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!