Vidarbh24News

Latest Online Breaking News

अबब! एका दिवसात ११ कोरोना बाधीत

चंद्रपूर जिल्ह्यात रविवारी एकाच दिवशी 11 कोरोना बाधीत

जिल्हातील बाधीताची

संख्या पोहचली 39 वर

Ø  बाहेरून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक

Ø  316 नमुने प्रतीक्षेत

Ø  14 दिवस पूर्ण झाल्यामुळे 8 कंटेनमेंट झोन बंद

Ø  संस्थात्मक अलगीकरणात एक हजारांवर नागरिक

Ø  70 हजारांवर नागरिकांचे गृहअलगीकरण पूर्ण

चंद्रपूर, दि. 7 जून: चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आज रविवारी दिनांक 7 जून रोजी एकाच दिवशी 11 कोरोना पॉझिटीव्ह आढळले. जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आता जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या 39 झाली आहे.

यामध्ये मुंबईवरून आलेला शास्त्री नगर चंद्रपूर येथील 31 वर्षाचा पुरुष , नवी दिल्लीवरून गडचांदूर येथील 27 वर्षाचा व्यक्ती, जळगाव वरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 36 वर्षाचा व्यक्ती, यवतमाळ वरून आलेला नागभीड तालुक्यातील पूनघाडा रिठ या गावचा 36 वर्षीय व्यक्ती, ओडीसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावचा 40 वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभिड शहरातील 45 वर्षाचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्ती सह ब्रह्मपुरी येथील कोविड केअर सेंटर मधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या एकूण 5 व्यक्तींचा समावेश आहे. यापैकी अड्याळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य 3 नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला 43 वर्षाचा व 27 वर्षाचा पुरूष आहे.तर गुजरात मधून आलेला कुडे सावली येथील एक व्यक्ती आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 22 कोरोना बाधित कोरोना मुक्त होऊन त्यांना सुटी देण्यात आली आहे. सध्या जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह कोरोना बाधितांची संख्या 17 आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यामध्ये परराज्यातून, परजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण बंधनकारक असणार आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

8 कंटेनमेंट झोन बंद; सध्या 9 कंटेनमेंट झोन कार्यरत:

जिल्ह्यात एकूण 17 कंटेनमेंट झोन कार्यान्वित करण्यात आलेले आहे. यापैकी कृष्णनगर चंद्रपुर, बिनबा गेट चंद्रपुर, दुर्गापुर वार्ड क्रमांक 3 चंद्रपूर, जाम तुकुम पोंभुर्णा, लक्कडकोट राजुरा, विरव्हा सिंदेवाही, विसापूर बल्लारपूर, बाबुपेठ चंद्रपूर या 8 कंटेनमेंट झोनचे 14 दिवस पूर्ण झाले आहे. त्यामुळे सदर झोन बंद करण्यात आलेले आहे. सध्या जिल्ह्यात 9 कंटेनमेंट झोन कार्यरत आहेत.

कंटेनमेंट झोनमध्ये आयएलआय व सारीची तपासणी:

कंटेनमेंट झोनमध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकामार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे व आयएलआय व सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे. तसेच आयएलआय व सारी रुग्णांचे स्वॅब नमुने घेण्यात येत आहेत.

एकूण 17 कंटेनमेंट झोन मधील आयएलआय रुग्णांचे आजपर्यंत 44 नमुने घेण्यात आले होते. यापैकी  42 नमुने निगेटिव्ह तर दोन नमुने प्रतीक्षेत आहे.

कोविड-19 संक्रमित 39 बाधीतांची चंद्रपूर जिल्ह्यात इतर राज्यातून, जिल्ह्यातून,रेडझोन मधून प्रवास केल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील राज्यनिहाय व जिल्हानिहाय एकूण संख्या पुढील प्रमाणे आहे. दिल्ली -2, हरियाणा (गुडगाव)-1, हैद्राबाद-1, मुंबई-9, ठाणे -2, पुणे-6, यवतमाळ -4, नाशिक -3, गुजरात-1, जळगांव-1, ओडीसा-1, कोणत्याही प्रकारचा प्रवासाचा इतिहास नाही किंवा पॉझिटिव्ह रुग्णांचे सहवासीत – 8 आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यामध्ये 1 हजार 610 स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविले होते. यापैकी 39 नमुने पॉझिटिव्ह,1 हजार 255 नमुने निगेटिव्ह तर 316 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 7 जून रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 1 हजार 293 नागरिक आहेत. ग्रामस्तरावर 660 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.तालुकास्तरावर 339 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत. तर, जिल्हास्तरावर 294 नागरिक संस्थात्मक अलगीकरणात  आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यात 75 हजार 497 नागरिक दाखल झाले आहेत.तसेच 70 हजार 39 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झालेले असून 5 हजार 458 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधीत ), 13 मे ( एक बाधीत), 20 मे ( एकूण 10 बाधीत ), 23 मे ( एकूण 7 बाधीत),24 मे ( एकूण 2  बाधीत), 25 मे ( एक बाधीत ), 31 मे ( एक बाधीत ), 2 जून (एक बाधीत), 4 जून ( दोन बाधीत), 5 जून ( एक बाधीत),6 जून ( एक बाधीत), 7 जून ( 11 बाधीत)  अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधीत 39 झाले आहेत. आतापर्यत 22 बाधीत बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 39 पैकी अॅक्टीव्ह बाधीतांची संख्या आता 17 आहे.

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी नोंदणी व आरोग्य तपासणी करावी :

बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी चंद्रपूर शहरात शकुंतला लॉन येथे नोंद व तपासणी करावी. जिल्ह्याच्या अन्य तालुक्याचे ठिकाणी बस स्टॅन्ड परिसरात ही आरोग्य तपासणी व नोंदणी सुरू आहे. जबाबदार नागरिक म्हणून बाहेरून आलेल्या प्रत्येक नागरिकांनी आपल्या नावाची नोंदणी व आरोग्य तपासणी करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!