मुख्यमंत्रांच्या आव्हाहनाला भव्य प्रतिसाद पोलीस नवविवाहित जोडप्यासह १३१ लोकांनी केले रक्तदान
पोलीस, नवविवाहित जोडपे व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी केले रक्तदान
गडचांदूर – मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विविध संस्थांच्या वतीने नुकतेच बालाजी सेलिब्रेशन गडचांदूर येथे रक्तदान शिबीर पार पडले. या शिबिरात एकूण १३१ जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदविला आहे.
आमदार सुभाष धोटे मित्र मंडळ, कोरपना तालुका मराठी पत्रकार संघ आदींच्या वतीने गडचांदूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रमुख अरुण निमजे, राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, ठाणेदार गोपाल भारती, पंचायत समितीचे माजी सभापती नोगराज मंगरूळकर, गडचांदूरच्या नगराध्यक्ष सविता टेकाम, राजुराचे उपनगराध्यक्ष सुनिल देशपांडे, गडचांदूरचे उपनगराध्यक्ष शरद जोगी, नगरपालिकेचे गटनेते विक्रम येरणे, गटनेत्या कल्पना निमजे, नगरसेविका मीनाक्षी एकरे, शिवसेनेचे माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, आरोग्य सभापती जयश्री ताकसांडे, हंसराज चौधरी, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, राहुल उमरे, अरविंद मेश्राम, अर्चना वांढरे आदी मान्यवर उपस्थित होते. १३१ रक्तदात्यांसह जिल्ह्यात एकाच ठिकाणी घेतलेले सर्वात मोठे रक्तदान शिबिर ठरल्याचे डॉक्टरांच्या चमूने सांगितले. शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होण्याचे आवाहन आमदार सुभाष धोटे यांनी केले होते.
शिबिराच्या यशस्वितेसाठी कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आशिष देरकर, सचिव शशांक नामेवार, प्रा शरद बेलोरकर, प्रा विजय आकनूरवार, उध्दव पुरी , नगरसेवक विक्रम येरणे, बालाजी पुरी, सतीश बेतावर, अशोक बावणे, राहुल उमरे, अभय मुनोत, उमेश राजुरकर, शैलेश लोखंडे, गणेश तुराणकर, प्रितम सातपुते, प्रवीण झाडे, रुपेश चुधरी, मयूर एकरे, आकाश वराठे, चेतन शेंडे, निखिल एकरे, आशिष वांढरे, अतुल गोरे व इतरांनी सहकार्य केले.
ठाणेदारांसह १५ पोलिसांचे रक्तदान
गडचांदूरचे ठाणेदार गोपाल भारती, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे, पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील, पोलीस उपनिरीक्षक शुभांगी ढगे यांच्यासह एकूण १५ पोलिस कर्मचाऱ्यांनी या रक्तदान शिबिरात रक्तदान करून कोरोनाच्या संकटातहीआपले योगदान दिले.
नववर-वधुंनीही केले रक्तदान
कोरपना तालुक्यातील बाखर्डी येथील नववर स्वप्नील एकनाथ सोनवणे व नववधू रेश्मा रमेश लाड या दाम्पत्यांनी विवाहानंतर लगेच रक्तदान करून एक नवा आदर्श निर्माण केला.
आपले सरकार सेवा केंद्र चालक सतीश बेतावार यांची रक्तदान करण्याची ही पंचवीसवि वेळ होती, त्यांचे सर्वांनी विशेष अभिनंदन केले।



