Vidarbh24News

Latest Online Breaking News

विज बील माफ करा – आसिफ सय्यद

विज बील माफ करा – आसिफ सय्यद

कोविड 19 या संसर्गजन्य रोगा मुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे.
या लॉकडाऊनच्या कालावधीत देशाची संपूर्ण आर्थिक परिस्थिती ठप्प झाली आहे. या बिकट परिस्थितीचा सर्वात जास्त आर्थिक ताण सामान्य व गरीब जनतेला पडलेला आहे. आजच्या स्थितीत गरीब व सामान्य जनता दोन वेळ चे अन्नासाठी धावपळ करीत आहेत. अशातच महावितरण विभागाच्या भरमसाठ वीज बिलामुळे आधीच आर्थिक खाईत कोसळलेल्या गरीब व सामान्य जनतेला जगावे की मरावे असा प्रश्न त्यांचा समोर येऊन उभा ठाकला आहे. आपण या आर्थिक गरीब परिस्थितीत सारासार विचार करून मार्च एप्रिल व मे या तीन महिन्याचे वीज बिल माफ करून गरीब व सामान्य जनतेला जगण्याचा आधार द्यावा असे राजुरा राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे तहसीलदार राजुरा यांना निवेदन देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष संतोष देरकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे तालुकाध्यक्ष आसीफ सय्यद, शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, तालुका उपाध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, तालुका महासचिव अल्विन सावरकर, विजय हजारे, तर अक्षय डकरे, प्रमोल चांदेकर, राहील शेख उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!