पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे अशी नागरिकांची मागणी
- पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे अशी नागरिकांची मागणी
- अनेक अधिकारी व कर्मचारी करतात ये- जा
- कोरोनाच्या संक्रमणाचा धोका
- जिल्ह्यात ३२ कोरोना बाधित
ग्रामीण प्रतिनिधी /भामरागड
विदर्भ 24 न्युज
गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२ झाली आहे. भामरागड पंचायत समिती मधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तालुका मुख्यालयातच राहून सेवा दयावी. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हि बाब अत्यंत गरजेची आहे.यानंतरही अधिकारी- कर्मचारी ऐकत नसतील तर त्या कर्मचार्यांना इन्स्टिट्यूटशनल क्कारनटाईन करून ठेवावे अशी मागणी भामरागड तालुक्यातील नागरिक करीत आहेत.
पंचायत समितीचे बरेचशे अधिकारी व कर्मचारी आठवड्यातून एकदा आपल्या स्वगावी जात-येत असतात व आल्यानंतर आपले कर्तव्य बजावतात. त्या अधिकाऱ्याचा प्रत्यक्ष संबंध नागरिकांशी येत असल्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका जास्त आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



