राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा. अरुण आलेवार द्वितीय

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा. अरुण आलेवार द्वितीय
नितीन गोरडवार/ विदर्भ 24 न्युज
ग्रामीण प्रतिनिधी, पेंढरी मक्ता
भांडुप येथे बुद्धजयंती निमित्य “गौतम बुद्धाचा जीवनपट” या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत अनेकांनी सहभाग घेतला. त्यात द्वितीय पारितोषिक प्रा. अरुण बाबुराव आलेवार यांनी प्राप्त झाले. ते पेंढरी मक्ता येथील रहिवाशी आहेत. सध्या ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून डॉ अरुण मोटघरे महाविद्यालय कोंडा कोसरा येथे आहेत. त्यांनी आपले पारितोषिक आपले भाऊ दिवंगत भजनदास आलेवार यांना समर्पित केले. सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे.