Vidarbh24News

Latest Online Breaking News

जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संखेत आणखी वाढ कोरोना रुग्णाची संख्या झाली १५, नागरिकांमध्ये दहशत

 

जिल्ह्यातील कोरोना रुग्णाच्या संखेत आणखी वाढ

कोरोना रुग्णाची संख्या झाली १५, नागरिकांमध्ये  भीतीचे वातावरण 

 

कुणाल उंदिरवाडे  / विदर्भ 24 न्युज

शहर प्रतिनिधी, सिंदेवाही   

 

       चंद्रपुरात आज तीन नवे रुग्ण मिळाले असून आता मिळालेला रुग्ण ही सिंदेवाही इथली असून ती १६ वर्षीय तरुणी आहे. थोड्या वेळापूर्वी रुग्ण बल्लारपूर येथील टिळक नगर परिसरातील नागरिक मुंबईतील धरावी वस्तीमधून २० मे रोजी बल्लारपूर शहरात पोहचला होता  या व्यक्तीला आला त्याच दिवसापासून संस्थ्त्मक अलगीकरण करण्यात आले होते. २२ मे रोजी सकाळी त्याचे  स्वब नमुने घेण्यात आले होते त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

        तत्पूर्वी आज सकाळी चंद्रपूर शहरातील बाबू पेठ परिसरातील आहे. मुंबई येथील एका खासगी इन्स्टिट्यूटमध्ये ही युवती स्टाफ नर्स म्हणून काम करत होती. यापूर्वी 22 दिवस मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही युवती संस्थात्मक अलगीकरणात( इन्स्टिट्यूशनल कॉरेन्टाइन ) होती. १६ मे रोजी मुंबईवरून ही युवती चंद्रपूर येथे आली. तेव्हापासून होम कॉरेन्टाइन होती. लक्षणे जाणवायला लागल्यावर 20 मे रोजी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयरुग्णालयात दाखल झाली. 21 मे रोजी या युवतीच्या स्वॅबचा नमुना घेण्यात आला. काल रात्री उशिरा नागपूर येथून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याला पकडून आता १४ रुग्ण झाले आहेत.

     या युवतीच्या घरातील आई,वडील व बहीण या तिघांचे नमुने घेण्यात येणार आहे.  त्यांना देखील संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे.

       22 मे च्या रात्री आलेल्या या अहवालामुळे आता एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 13 झाली आहे. यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 2 मे रोजी पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला होता. त्यानंतर 13 मे रोजी दुसरा रुग्ण आढळला. 20 व 21 मे रोजी  एकूण 10 रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 13 पॉझिटिव्ह झाली आहे. 2 मे रोजी आढळलेल्या पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाला नागपूर येथून डिस्चार्ज करण्यात आले आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!