Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोरोनाबाधित रुग्णांकडून खाजगी रुग्णालयात कोव्हीड उपचाराकरीता दर झाले निश्चित

★निर्धारीत दरापेक्षा जास्त दर घेतल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत होणार कारवाई…

यवतमाळ (दि. 12 एप्रिल ):– कोरोनाबाधित रुग्णांकडून खाजगी रुग्णालयात कोव्हीड उपचाराकरीता दर झाले आहे.निर्धारीत दरापेक्षा जास्त दर घेतल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारामध्ये सीटीस्कॅनची आवश्यकता भासत आहे. त्याकरीता 16 ते 64 स्लाईस या क्षमतेच्या एचआरसीटी साठी मशीनच्या क्षमतेनुसार दर मयार्दा निश्चित करण्यात आली आहे. तसेच कोरोना रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्यक रिएजंटस्, व्हीटीएम किट, पीपीई किट्स,आरएनए एक्स्ट्रक्शन आणि आरटीपीसीआरबाबत सुध्दा दर निश्चित करण्यात आले आहेत. यात एन – 95 मास्क सर्व करांसह 15 ते 49 रुपयांपर्यंत, ठरलेल्या ठिकाणावरून चाचणीसाठी सॅम्पल गोळा करणे, वाहतूक करणे व चाचणी अहवाल देणे यासर्व बाबींसाठी 500 रुपये, विशेष सॅम्पल तपासणी कॅम्पमधून सॅम्पल गोळा करणे, त्याची वाहतूक करणे, दवाखाने, कोव्हीड केअर सेंटर, क्वॉरंटाईन सेंटरमधून सॅम्पल गोळा करणे 600 रुपये, रुग्णाच्या निवास स्थानावरून सॅम्पल गोळा करणे त्याची वाहतूक करणे व अहवाल गोळा करणे 800 रुपये राहील. याशिवाय रॅपिड ॲन्टीजन / ॲन्टीबॉडीज (ELISA / CLIA/ ट्रॅनॅट, सीबी नॅटद्वारे तपासणीसाठी समितीद्वारे दर निश्चित करण्यात आले आहे.) यात इलिसा कोव्हीड टेस्टसाठी रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 250 रुपये, तपासणी केंद्रावर अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास 300 रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 400 रुपये.  CLIA कोव्हीड टेस्टसाठी रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 350 रुपये, तपासणी केंद्रावर अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास 450 रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 550 रुपये.

रॅपीड ॲन्टीजन टेस्टसाठी रुग्ण स्वत: प्रयोगशाळेत तपासणीसाठी आल्यास 150 रुपये, तपासणी केंद्रावर अथवा एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास 200 रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन तपासणीसाठी नमुना घेतल्यास 300 रुपये आणि सीबीनॅट टेस्टसाठी 1200 रुपये आकारण्यात आले आहे.

सीटीस्कॅन एचआरसीटी दर पुढीलप्रमाणे आहे. 16 स्लाईसपेक्षा कमी सीटीस्कॅनसाठी 2 हजार रुपये, 16 ते 64 स्लाईससाठी मल्टी डिटेक्टर सीटी 2500 रुपये, 64 स्लाईसपेक्षा जास्त मल्टी डिटेक्टर सीटीकरीता 3 हजार रुपये सर्व करांसह राहील. तसेच महात्मा ज्योतिबा फुले योजनेचा लाभ सर्व रुग्णांना देण्यात यावा. खाजगी रुग्णालयातील 80 टक्के बेड कोव्हीड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येऊन त्याबाबतचे दर शासनाने ठरवून दिलेल्या दरपत्रकानुसारच घ्यावे. आरटीपीसीआर टेस्ट, ॲन्टीजन  टेस्टचे दर शासन दरपत्रकानुसार घेण्यात यावे. कोरोनाबाधित रुग्णांकडून खाजगी रुग्णालयात कोव्हीड उपचाराकरीता घ्यावयाचे दर खालीलप्रमाणे आहे.जनरल वॉर्ड विलगीकरण एक दिवसाचा दर 4000 रुपये (यात रुग्णांची नियमित देखभाल, रक्त व लघवी तपासणीचा समावेश), आयसीयु (व्हेंटीलेटरशिवाय) विलगीकरणाचा एक दिवसाचा दर 7500 रुपये (यात सीबीसी, युरीन, रुटीन, एचआयव्ही स्पॉट ॲन्टी, एचसीव्ही, एचबीएस ॲन्टी, सेरम, क्रियेटीनाईनचा समावेश), आयसीयू (व्हेंटीलेटरसह) विलगीकरणाचा एक दिवसाचा दर 9000 हजार रुपये (यात इतर तपासण्या, सोनोग्राफी, 2-डी ईको, एक्सरे, ईसीजी, मर्यादित किरकोळ औषधी, डॉक्टर्स तपासणी, रुग्ण बेड चार्जेस, नर्सिंग चार्जेस, जेवण, छोटे उपचार नाकातून नळी टाकणे, लघवीसाठी नळी टाकणे यांचा समावेश) आहे. तसेच एक दिवसाच्या दरामध्ये पुढील गोष्टींचा समावेश नाही व त्या गोष्टींचा स्वतंत्र दर रुग्णालयाकडून आकारला जाईल. यात पीपीई किट, सेंट्रल लाईन टाकणे, केमोपार्ट टाकणे, श्वसन नलिकेत / अन्न नलिकेत दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, कोणत्याही अवयवाचा तुकडा तपासणीसाठी पाठविणे, छातीतील / पोटातील पाणी काढणे यांचा समावेश आहे.

तसेच कोव्हीड तपासणी शासकीय केंद्रामध्ये मोफत तर खाजगी प्रयोगशाळेद्वारे केल्यास शासनाने केलेल्या दराप्रमाणे दरआकारणी करावी लागेल. औषधे, इमिन्युग्लोबिन, मरापेनम, शिरांद्वारे दिली जाणारी पोषण औषधे, टोसिलीझुमॅब इत्यादी दर छापिल किमतीनुसार असेल. तपासण्या , सीटीस्कॅन, एमआरआय, पॅटस्कॅन, इत्यादीसाठी दर आकारणी 30 डिसेंबर 2019 च्या शासन दर पत्रकाप्रमाणे रुग्णालय आकारू शकतात.

रुग्णवाहिकाकरीता पुढीलप्रमाणे दर आकारण्यात येईल. साधी रुग्णवाहिका भाडे दर इंधनविरहित 300 किमी पर्यंत (24 तासाकरीता चालकासह) 1400 रुपये, भाडेदर 80 किमीसाठीचा एकूण दर (इंधन, चालक आणि मदतनीस) 1900 रुपये, दर प्रति किमी (इंधनासह) 12 रुपये, 24 तास 100 किमी साठीचा एकूण दर (इंधन, चालक आणि मदतनीस) 2200 रुपये, इंधनामध्ये होणारी सरासरी धाव 11 किमी राहील. तर सर्व सुविधेसह उपलब्ध रुग्णवाहिका भाडे दर इंधनविरहित 300 किमी पर्यंत (24 तासाकरीता चालकासह) 2500 रुपये, भाडेदर 80 किमीसाठीचा एकूण दर (इंधन, चालक आणि मदतनीस) 3300 रुपये, दर प्रति किमी (इंधनासह) 16 रुपये, 24 तास 100 किमी साठीचा एकूण दर (इंधन, चालक आणि मदतनीस) 3500 रुपये, इंधनामध्ये होणारी सरासरी धाव 10 किमी राहील. दर निश्चिती ही साथरोग अधिनियम 1897 नुसार सक्षम प्राधिका-याच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आली आहे. कोणत्याही शासकीय, निमशासकीय, खाजगी कोव्हीड रुग्णालय, खाजगी पॅथलॉजी, खाजगी पुरवठादार, यांच्याकडून वरील नमुद बाबीकरीता निर्धारीत दरापेक्षा जास्त दर घेतल्याचे निदर्शनास आल्यास साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत कारवाई करण्यात येईल,असे जिल्हाधिकारी यांच्या आदेशात नमुद आहे.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!