वणी नगरपरिषदेच्या पाणीपट्टी गबन प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढली

वणी (11.एप्रिल ) :- काही दिवसाआधी नगर परिषद मध्ये मागील एक वर्षा १७लक्ष ३४ हजार रू. हेराफेरी केल्याची घटना उघडकीस आली होती. यामध्ये कंत्राटी कामगारासह ,एक पालिका कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ह्याच तपासामध्ये या घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोन पालिका कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. कंत्राटी कामगार अंकिता रामचंद्र कोयचाडे यांच्या तक्रार नोंद करताच ,तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंकितचा कस्सून चौकशी केली तेव्हा लिपिक संजय दखणे यांचाही सहभाग होता .यामध्ये स्पष्ट झाले.त्याच बरोबर कर संग्राहक सुभाष आवारी व रोखपाल सतिश पचारे ही पालिका कर्मचार्यांची नविन नावे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
या घोटाळ्यात एक कंत्राटी कामगार व तिन पालिका कर्मचारी अडकल्याने वणीकरांच्या भोवया उंचावल्या आहे. तरी या मोठ्या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार कोण?? असा सवाल जनतेला पडला आहे.
समोरील तपास पोलिस निरीक्षक वैभव जाधव यांच्या नेतृत्वाखाली,पोलिस उप निरिक्षक शिवाजी टिपुर्णे करीत आहे.