ऐका हो साहेबांनो !!! गरीबांच्या स्वयंपाकातील फोडणी पण केली महाग …आता जगावे की मरावे ?- गरीबांची आर्त हाक

★” सबका साथ सबका विकास ,गरीबाच्या जेवणात गोडे तेलाचा भकास ”
वणी (9 .एप्रिल ) :– आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या युगात जगाची वाटचाल परग्रहावर विविध शोध,संशोधनाच्या माध्यमातून परग्रहवासी बनण्यासाठी विविध उपग्रहाच्या साहाय्याने संशोधन सुरू आहे, तर दुसरीकडे भारतासारख्या डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या देशात गरिबांच्या स्वयंपाकातील खाद्यतेलाची फोडणी महागाईच्या उच्चांकामुळे गरीब हा मरणयातना भोगाव्या लागत आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोहीकडे पेट्रोल डिझेल च्या वाढत्या किमतीची चर्चा चालू असताना सर्वसामान्यांच्या स्वयंपाकातील खाद्यतेलाच्या वाढलेल्या दराचा जणू विसरच पडलेला दिसतो आहे.
ग्रामीण परिसरात अनेक कुटुंब रोजंदारी करतात, संसाराचा गाडा हाकताना त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
गॅस दरवाढीचा चटका सोसत असतानाच,वाढीव वीजबिलापासून ते सर्वसामान्यांच्या स्वयंपाकातील महत्वपूर्ण समजले जाणारे तेल. याच खाद्यतेलाच्या किमती गगनाला भिडले असल्याने गरीबाच्या फोडणीस विरजण पडण्याचे चिन्हे दिसू लागले आहेत.किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे भाव 150 रुपये किलो झाल्याने गरीबाच्या खिसा रिकामा होताना दिसतो आहे.
तर काहीच्या स्वयंपाकातील तेलाची धार लहान झाल्याचे बोलले जाते आहे.50 दिवसात 30% खाद्यतेलाच्या किमती वाढले असल्याचे मत सुजाण नागरिकाद्वारे व्यक्त केले जाते आहे.सबका साथ सबका विकास ,गरीबाच्या जेवणात गोडे तेलाचा भकास चे चित्र मात्र स्पष्ट दिसू लागले आहेत.