Vidarbh24News

Latest Online Breaking News

भद्रावती येथे सिनेस्टार रजा मुराद यांच्या हस्ते ” अपनापन ” निराधार केंद्राचे उदघाटन

भद्रावती : आपल्या सामाजिक कार्याच्या बळावर व निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने संपूर्ण देशभरात नावारूपास आलेल्या हुमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशनच्या अध्यक्षा शाहिस्ता खान पठाण व त्यांच्या संघटने तर्फे निराधार वयोवृद्ध महिला पुरुष व लहान बालकांसाठी हक्काचे आश्रयस्थान उभारण्यात आले व या आश्रयस्थानाचे नामकरण “अपनापण” असे करण्यात आले.

आज 03 एप्रिल रोजी बॉलिवूड मधील प्रख्यात अभिनेता रजा मुराद यांच्या हस्ते या निराधार केंद्राचे विधिवत उदघाटन शिंदे मंगल कार्यालय भद्रावती येथे  करण्यात आले

शाहिस्ता खान पठाण यांच्या सामाजिक कार्य बघून रजा मुराद हे भारावून गेले त्यांनी शाहिस्ता यांना ” भद्रावती येथील मदर टेरेसा” असे संबोधित केले.

आपण उभ्या आयुष्यात स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांचे छायाचित्र एकाच फ्रेम मध्ये बघितले नसून हे आदर्शवादी चित्र आपल्याला भद्रावतीत पाहायला मिळाले अश्या शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

 याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून अनिल धानोरकर नगराध्यक्ष भद्रावती, प्रशांत भारती इंटक युवक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,रवींद्र शिंदे, मुस्ताक पठाण जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर, सोहेल रजा कॉंग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष चंद्रपूर,मुनाज शेख राष्ट्रवादी नेते, वासुदेव ठाकरे हे होते .

मान्यवरांच्या हस्ते सामाजिक संस्थेच्या खालील पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आला यामध्ये प्रियंका करमरकर, सुधा पाचघरे,राजलक्ष्मी फुटाणे,अनिता वनकर,करुणा मेश्राम,सीमा घायवान,शालू दुपारे, आम्रपाली गावंडे,ज्योती घडले,रितेश भगत, संध्या खडसे,सुजाता राहुलगडे, सबिहा देवगडे, उषा मून,किरण सूर्यवंशी, रिजवाना खान, आदींचा समावेश होता.कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता शाहिस्ता खान पठाण व हुमन वेलफेअर मल्टीपर्पज असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यां तर्फे अथक परीश्रम करण्यात आले.

 

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!