Vidarbh24News

Latest Online Breaking News

महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीच्या वतीने शहीद दिनी “भगतसिंग, राजगुरू, सुखदेव”यांना अभिवादन ….

वणी (24 .मार्च ) :- भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक “भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ” यांना 23 मार्चला फाशी देण्यात आली होती. त्यामुळे तो दिवस शहीद दिन म्हणून भारतात त्यांना सर्व ठिकाणी अभिवादन करण्यात येत असते. त्याच अनुषंगाने वणी येथील जत्रा रोड स्थित भगतसिंग चौकात त्यांच्या तैलचित्राला अभिवादन करून तिघांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

युवकांच्या मनातील त्यांच्या स्वातंत्र्य चळवळ व बलिदानाविषयी माहिती मिळावी म्हणून पुढे लॉकडाऊन नंतर काही उपक्रम राबविण्याचा निर्धार समितीच्या वतीने उपस्थितांनी घेतला. महापुरुष विचार प्रचार प्रसार व स्मारक संवर्धन समितीच्या वतीने शहीद”भगत सिंग, राजगुरू, सुखदेव” यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांच्या तैलचित्राला हारार्पण व फुलार्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी समितीचे मार्गदर्शक  कुंतलेश्वर तुरविले,सागर झेप संस्थेचे अध्यक्ष ,समितीचे संघटक कासार सागर मुने,ग्राहक कल्याण परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्री अनुराग काठेड, समन्वयक लोकसेवक अमित उपाध्ये, कार्यक्रम प्रमुख युवा विचारवंत सृजन गौरकार , जागृत पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप बेसरकर, युवा उद्योजक आशिषजी काळे ,भगवंता कुडमेथे, सुदाम गावंडे, दत्तात्रय गावंडे, बाबराव गेडाम, अनुराग काठेड, माजी नगरसेवक तथा भाजप आदिवासी आघाडीचे प्रमुख दिगंबर चांदेकर हजर होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!