मुर्धोनी येथे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते विकास कामाचे उद्घाटन
वणी( 20 .मार्च ) :– तालुक्यातील मुर्धोनी येथे जिल्हा खनिज विकास निधी अंतर्गत पाणी पुरवठा कामासाठी ४१ लक्ष ४२ हजार रुपयाच्या कामाचे भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पिंपळशेंडे सभापती पं.स.वणी तथा जिल्हा उपाध्यक्ष भाजपा,
तर प्रमुख उपस्थीतीत गजानन विधाते तालुकाध्यक्ष वणी
संघदीप भगत सदस्य,जि.प.यवतमाळ,कैलास पिपराडे सरपंच मानकी तथा तालुका सरचिटणीस, संजय झाडे उपाध्यक्ष,
प्रशांत भोज सरपंच मुर्धोनी,बंडू खंडाळकर सरपंच पळसोनी,
साईनाथ तोडासे उपसरपंच मुर्धोनी,शुभम इंगळेयांच्यासह गावातील समस्त नागरीक उपस्थित होते



