वणीतील निर्भीड व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक माया मारोती चाटसे यांना बेटी फाउंडेशनच्या वतीने सन्मानित…
वणी (20 मार्च ):– जागतिक महिला दिनाचे-औचित्य साधून वणीतील बेटी फाउंडेशन तर्फे निर्भिड अशी व्यक्तीमत्व असणारी कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक (A.P.I ) माया मारोती चाटसे यांना भारत भूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

सविस्तर वृत्त असे की, आयोजित कार्यक्रम हा जागतिक महिला दिनाचे औचित्यसाधून वणी येथील प्रिंस लॉन येथे मोठ्या थाटात घेण्यात आला.त्यात वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या क्रीडा कला ,शैक्षणिक ,साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील महिलांचा गौरव करण्यात आला.महत्वाचे म्हणजे वणीतील निर्भीड व कर्तव्यदक्ष महिला म्हणून सहाय्यक पोलिस अधिक्षक( A.P.I ) माया मारोती चाटसे ” भारत भूषण राष्ट्रीय 2021 “ म्हणून यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ललित पंडित यानी केले व आभार प्रदर्शन प्रिती दरेकर(बेटी फाउंडेशनचा अध्यक्षा )यांनी केले.
या कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे म्हणून राकेश खुराणा(माजी नगराध्यक्ष) ,विक्रांत चचड़ा (युवसेना शहर अध्यक्ष ), किरण देरकर (एकवीरा महिला पतसंस्था अध्यक्षा ), वंदना आवारी (सामाजिक कार्यकर्ता), वंदना गानार ( फुले ,शाहू ,आंबेडकर संस्थेचे सचिव),राजू तुराणकर ( वणी शहर प्रमुख, शिवसेना) विशेष पाहुणे म्हणून नितेश कराडे ( फीनिक्स करियर अकैडमीचे संचालक (वर्धा) हे सर्व होते.

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता बेटी फाउंडेशनचा सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.



